Home /News /mumbai /

मुंबईसह उपनगरात पुन्हा लोकल सुरू करण्याची तयारी, असा आहे प्लॅन

मुंबईसह उपनगरात पुन्हा लोकल सुरू करण्याची तयारी, असा आहे प्लॅन

Mumbai: Passenger wearing a face mask, as a measure to prevent coronavirus spread, boards a train at CST railway station, in Mumbai, Friday, March 20, 2020. (PTI Photo/Kunal Patil)(PTI20-03-2020_000277B)

Mumbai: Passenger wearing a face mask, as a measure to prevent coronavirus spread, boards a train at CST railway station, in Mumbai, Friday, March 20, 2020. (PTI Photo/Kunal Patil)(PTI20-03-2020_000277B)

विशेष पासच्या आधारे प्रवास करता येणार आहे. मात्र सर्वसामान्य लोकांसाठी अद्याप लोकल सेवा सुरू नाही.

    मुंबई, 13 जून : मुंबई, 13 जून: अनलॉक 1 मध्ये अत्यवश्यक सेवा आणि सरकारी कार्यालयांमध्ये जाण्यासाठी प्रवाशांसाठी रेल्वेकडून काही विशेष लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचा अभ्यास करून पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी उपनगरातील भागांमध्ये लोकल सेवा सुरू करण्याबाबत विचार सुरू केला आहे. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना प्रवास करण्यासाठी विशेष पास देण्यात आला आहे. या पासच्या आधारे ते प्रवास करत आहेत. या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून पुन्हा लोकल सेवा सुरू करण्याबाबत विचार केला जात आहे. कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून लोकल सेवा स्थगित करण्यात आली आहे. दरदिवशी साधारण मुंबई, ठाणे आणि उपगरांसाठी 7.5 मिलियन लोक लोकलमधून प्रवास करतात. त्यामुळे लोकलमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका लक्षात घेऊन ही सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी स्थगित करण्यात आली. तर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांसाठी विशेष लोकल सेवा सुरू करण्यात आल्या.हे वाचा-धोका वाढला: मुंबईत सोसायटीने तयार केले ICU बेड्स, तर दिल्लीत ऑक्सिजन मशिन्स द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार ‘Mission Begin Again’ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी उपनगरात लोकल सेवा सुरू करण्याआधी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात अभ्यास केला आहे. देशभरात सुरू करण्यात आलेल्या श्रमिक ट्रेनचा पॅटर्न लोकल ट्रेनसाठी वापरण्याचा विचार पश्चिम आणि मध्ये रेल्वेचा सुरू आहे. अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सर्वांना विशेष पास सोबत घेऊनच प्रवास करता येणार आहे. जे अत्यावश्यक सेवेतील आणि सरकारी कर्मचारी लोकलमधून प्रवास करणार आहेत त्यांच्या नावांची यादी रेल्वेकडे देण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना विशेष पास देण्यात येतील. हा पास दाखवूनच या कर्मचारी अथवा कोरोना योद्धांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळणार आहे. उपनगरातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासादरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याशिवाय बसच्या प्रवासात खूप वेळ जात असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच प्रवाशांच्या संख्येनुसार लोकलची संख्या ठरवण्यात येणार आहे. हे वाचा-देशातले निम्मे रुग्ण राज्यात आणि राज्यातले निम्मे मुंबईत, हे आहेत HOT SPOTS द हे वाचा- बापरे! पानटपऱ्या बंद; मात्र महाराष्ट्रात पोहोचल्या 11 कोटींच्या सिगारेट संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Mumbai local

    पुढील बातम्या