Home /News /mumbai /

मुंबई आणि परिसरात सर्वाधिक धोका; कोरोनाग्रस्तांच्या संख्येने केले 100 पार

मुंबई आणि परिसरात सर्वाधिक धोका; कोरोनाग्रस्तांच्या संख्येने केले 100 पार

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतो आहे. शनिवारी एकाच दिवसात त्यात 22 जणांची भर पडली. कम्युनिटीत संसर्ग पसरला तर मुंबई हा कोरोनाव्हायरसचा पुढचा केंद्रबिंदू (Epicenter) ठरू शकेल.

    मुंबई, 28 मार्च : मुंबई, उपनगरं आणि आसपासच्या परिसरात मिळून कोरोनाग्रस्तांची संख्या बरीच वाढली आहे. शनिवारी हा आकडा शंभरीपार गेला. मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरं मिळून (MMR region) आज एकूण रुग्णाची संख्या 108 झाली आहे. यापैकी खुद्द मुंबईत 73 रुग्ण आहेत तर MMR भागात मिळून 35 रुग्ण आहेत. या भागात आतापर्यंत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतो आहे. शनिवारी एकाच दिवसात त्यात 22 जणांची भर पडली. शहरात कोरोनाची लागण वेगाने होते आहे. राज्यभरात एकूण 33 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. राज्याचा आकडा आता 186 वर गेला आहे. यात सर्वाधिक रुग्ण मुंबईचे आहेत. बापरे... देशात कोरोनाची कम्युनिटी लागण? सरकारची चिंता वाढली चीनमध्ये Coronavirus चा धोका वाढू लागला तो हुबेई (Hubei) प्रांतातल्या वुहान (Wuhan) या शहरातून. वुहानमधून हा विषाणू जगभरात पसरला आणि त्यानं रौद्र रूप धारण केलं. आता कोरोनाव्हायरसचं केंद्र (Epicentre) चीनमधून इटलीत हललं आहे. स्पेनमधली दोन शहरंही केंद्र होण्याच्या वाटेवर आहेत. आशिया खंडात आता चीननंतर भारताकडे धोका म्हणून पाहिलं जात आहे. त्यातही महाराष्ट्र आणि मुंबई या महासाथीचं भारतातलं केंद्र बनतं की काय अशी भीती आहे. कोरोनाव्हायरसने राज्यभर हातपाय पसरले आहेत, पण मुंबईत सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. आता इथल्या आरोग्य सेवांपुढे सर्वांत मोठं संकट उभं राहिलं आहे, कारण मुंबईच्या अरुंद झोपडपट्ट्यांपर्यंत आणि छोट्या चाळींपर्यंत Coronavirus पोहोचला आहे. घाटकोपरच्या झोपडपट्टीत एका 25 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. याच झोपडपट्टीत राहणाऱ्या 68 वर्षांच्या स्त्रीला त्याअगोदर लागण झाली होती. ती एका कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीकडे घरकाम करणारी आहे. आणखी एक पॉझिटिव्ह केस सापडली कलिनाच्या झोपडपट्टी भागात. एका 37 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. जेमतेम 8 बाय 10 फुटांच्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या वस्तीत कोरोनाव्हायरस पोहोचल्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचं काम बिकट झालं आहे. अशा वस्त्यांमध्ये कोरोनाव्हायरस पोहोचल्यामुळे त्याचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता आहे. महापालिकेचे कर्मचारी या वस्त्यांमध्ये फवारणी करत निर्जंतुकीकरण करत आहेत. पण संपर्कातून हा व्हायरस पसरलेला असण्याचा धोका नाकारता येत नाही. कोरोनाव्हायरसची लक्षण न दिसणारे अनेक जण कंडक्टर असू शकतात, त्यामुळे आता हा धोका आणखी पुढचे काही दिवस तरी कायम राहणार. अन्य बातम्या मुंबईत Coronavirus मुळे एका डॉक्टरचा मृत्यू; घरातले 6 जणही निघाले पॉझिटिव्ह कोरोन विरोधात लढ्यात 'हा' आहे राज्य सरकारचा '3 टी' फॉर्म्युला!
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या