VIDEO : 'मी MIMचा कार्यकर्ता, इथंली दुकानं बंद नाही करायची, नाहीतर...', मुंबईत पोलिसांनाच दिली धमकी

VIDEO : 'मी MIMचा कार्यकर्ता, इथंली दुकानं बंद नाही करायची, नाहीतर...', मुंबईत पोलिसांनाच दिली धमकी

या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रिझवान जुबेर मेमन उर्फ रिझवान तुंडा याला पोलिसांनी अटक केली आहे.

  • Share this:

मुंबई, 2 मे : “मैं एमआयएम का कार्यकर्ता हूं, हमारे कुर्ला पाईप लाइन रोड की दुकान बंद मत करो... तुम सबकी वर्दी उतार दूंगा” असं बोलून मुंबईतील कुर्ला पाईपलाईन रोड येथे पोलिसांशी गैरवर्तन करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रिझवान जुबेर मेमन उर्फ रिझवान तुंडा याला पोलिसांनी अटक केली आहे.

कुर्ला पाईप लाईन रोड येथे गस्तीवर असताना काही दुकाने सुरू असल्याचे पोलिसांना दिसले. त्यानंतर संबंधितांना पोलिसांनी ती दुकाने बंद करायला सांगितले असता रिझवान जुबेर मेमन उर्फ रिझवान तुंडा या व्यक्तीने “मैं एमआयएम का कार्यकर्ता हू, हमारे कुर्ला पाईप लाइन रोड के दुकान बंद मत करो ... तुम सबकी वर्दी उतार दुंगा” अशी थेट पोलिसांनाच धमकी देवून टाकली.

एवढेच नाही तर तो पोलिसांच्या अंगावर धावून गेला. हे पाहून पोलिसांनी रिझवान जुबेर मेमन उर्फ रिझवान तुंडा याच्यावर कारवाई करण्याकरता अधिक कुमक मागवली मात्र परिसरातील नागरिकांनी गोंधळ घालत पोलिसांना पुन्हा हुसकावून लावले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर वरीष्ठांच्या आदेशाने पोलिसांनी रिझवान जुबेर मेमन उर्फ रिझवान तुंडा याला अटक केली आहे.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडू नये यासाठी पोलीस कर्मचारी मेहनत घेत आहेत. मात्र अशा पोलिसांवरच हल्ले होत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे अशा हल्लेखोरांवर कठोर कारवाई होण्याची आवश्यकता आहे.

First published: May 2, 2020, 3:13 PM IST

ताज्या बातम्या