राज्यात नोंदली गेली दिवसभरातली विक्रमी रुग्णसंख्या; नवी मुंबईत झाले 10 मृत्यू

राज्यात नोंदली गेली दिवसभरातली विक्रमी रुग्णसंख्या; नवी मुंबईत झाले 10 मृत्यू

आज दिवसभरात विक्रमी रुग्णसंख्या नोंदवली गेली. दिवसभरात 1602 नवीन रुग्णांचं निदान झालं आणि 44 जणांचा मृत्यू झाला. यातले सर्वाधित 25 मृत्यू मुंबईत आहेत. पण नवी मुंबईतही कोरोना बळींचा नवा आकडा समोर आला आहे.

  • Share this:

मुंबई, 14 मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेच आहे. आज दिवसभरात विक्रमी रुग्णसंख्या नोंदवली गेली. दिवसभरात 1602 नवीन रुग्णांचं निदान झालं आणि 44 जणांचा मृत्यू झाला. यातले सर्वाधित 25 मृत्यू मुंबईत आहेत. पण नवी मुंबईतही कोरोना बळींचा नवा आकडा समोर आला आहे. नवी मुंबईत दिवसभरात 10 मृत्यू नोंदवले गेले. आज नमूद करण्यात आलेले मृत्यू 14 एप्रिल ते 14 मे या कालावधीतील आहेत.

आज राज्यात दिवसभरात 44 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंची संख्या 1019 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील 25, नवी मुंबईत 10, पुण्यात 5,औरंगाबाद शहरात 2, पनवेलमध्ये 1 तर कल्याण डोंबिवलीमध्ये 1 मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 31 पुरुष तर 13 महिला आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून आज विक्रमी रुग्णांची नोंद झाली. संख्या वाढत असल्याने सरकार आणि राज्य हादरून गेलं आहे.  रुग्णाची एकूण संख्या ही 27524 वर गेली आहे.

मुंबईत आज तब्बल 991 रुग्णांनी वाढ झाली. तर आज 512 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. मुंबईत  कोरोनाच्या एकूण रुग्णाची संख्या 16579वर पोहचली आहे.

देशव्यापी लॉकडाऊन 17 तारखेला संपतो आहे. त्यानंतर व्यवहार सुरू झाले, तर कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढू शकतो. तसंच आंतरराज्य वाहतूक सुरू झाल्यानंतर काही श्रमिक आणि कामगारांना आपापल्या गावी जाण्याची मुभा देण्यात आली. त्यामुळे आता कोरोनाचा धोका ग्रामीण भागातही वाढू शकतो, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. पुढील काही काळात महाराष्ट्रात कोरोनारुग्णांची संख्या वाढण्याचा धोका असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात चौथा लॉकडाऊन जारी करण्याशिवाय पर्याय नसल्याचंही त्यांनी नाशिकमध्ये बोलताना सांगितलं होतं.

अन्य बातम्या

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये 31 मेपर्यंत वाढवला जाऊ शकतो लॉकडाऊन

कोरोनामुक्त गोव्यात मुंबईहून गेलेल्या प्रवाशांमुळे वाढले रुग्ण

‘रॉकस्टार आरोग्यमंत्री’; परदेशी मीडियामध्ये केरळच्या मंत्र्यांची तुफान चर्चा

First published: May 14, 2020, 9:26 PM IST

ताज्या बातम्या