COVID-19: राज्यात 24 तासांमध्ये वाढले 9251 रुग्ण, तर 7 हजार 227 जणांना रुग्णालयातून सुट्टी

COVID-19: राज्यात 24 तासांमध्ये वाढले 9251 रुग्ण, तर 7 हजार 227 जणांना रुग्णालयातून सुट्टी

राज्यात आत्तापर्यंत 2 लाख 7 हजार 194 जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 55.56 एवढं झालं आहे.

  • Share this:

मुंबई 25 जुलै: राज्यात आजही कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी 9251  रुग्णांची वाढ झाली. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने दररोज रुग्णांची संख्या 8 ते 10 हजारांच्या दरम्यान वाढत आहे. तर आज 257  एवढ्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 366368 एवढी झाली आहे. तर 13389 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. मुंबईत  1080 रुग्णांची वाढ झालीय. त्यामुळे एकूण संख्या 108060 एवढी झाली आहे. तर आज 7 हजार 227 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

राज्यात आत्तापर्यंत 2 लाख 7 हजार 194 जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 55.56 एवढं झालं आहे.

देशात आणि राज्यात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या आता सर्वोच्च पातळीवर आल्याचंही सांगितलं जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने Union Ministry of Health याविषयीची माहिती दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी Covide-19 टेस्टची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवली असल्याचं सांगण्यात येत आहे.

ही संख्या वाढविल्यामुळेच देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जेवढ्या जास्त टेस्ट होतील तेवढी संख्या वाढेल असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

देशात सुरुवातीच्या महिन्यांमध्ये फक्त 1 प्रयोगशाळा होती सध्या देशात 1,301 कोरोनाच्या टेस्ट लॅब आहेत. शुक्रवारपर्यंत 1,58,49,068 एवढ्या टेस्ट झाल्या आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 4,20,898 टेस्ट करण्यात आल्यात.

5 वर्षांच्या मुलासाठी सोनियाने स्कुटीवरून केला मुंबई-जमशेदपूर 1800 किमी प्रवास

देशात 10 लाख लोकांमागे 11,485 टेस्ट केल्या जात आहेत. यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचंही मंत्रालयाने म्हटलं आहे. देशात रुग्णांच्या मृत्यू दरात घसरण झाली असून सध्या त्याचं प्रमाण हे 2.35 एवढं आहे.

तर देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 63.54 एवढं आहे. मृत्यू दर आणि बरे होण्याचं प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत चांगलं आहे. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येने 13 लाखांचा आकडा पार केला आहे. तर 8,49,431 एवढे रुग्ण बरे झाले आहेत. देशात आत्तापर्यंत 31,358 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसवर यशस्वीपणे मात देऊन बरे होणाऱ्यांची संख्या देशात आतापर्यंत 8 लाख 49 हजाराहून अधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात मृत्यूचे प्रमाण 2.3 टक्के तर कोरोना व्हायरसमधून बरे होण्याचा रिकव्हरी रेट हा 63.5 टक्के आहे. कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारत जगभरात सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

फक्त ताप कोरोनाचं महत्त्वाचं लक्षण नाही; AIIMS च्या अभ्यासातूनही मिळाला दुजोरा

ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आता एकूण 3.5 लाखांवर कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला आहे. तामिळनाडूमध्ये जवळपास 2 लाख कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 25, 2020, 8:09 PM IST

ताज्या बातम्या