...तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय? सरकार 'अलर्ट मोड'वर
...तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय? सरकार 'अलर्ट मोड'वर
अनेक देशांना या व्हायरसशी दोन हात करण्यासाठी लॉकडाऊन लागू केला. आणि दोन ते तीन महिन्यांहून अधिक काळापर्यंत देशात लॉकडाऊन लागू केला. मात्र याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाला.
कोरोनाला रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊनचा अवलंब केला जाणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे.
मुंबई, 23 नोव्हेंबर : कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे दिलासा व्यक्त केला जात असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. महाराष्ट्रात पुणे, मुंबईसह ग्रामीण भागातील रुग्णसंख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊनचा अवलंब केला जाणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. याबाबत सरकारी पातळीवरही विचार विनिमय सुरू आहे.
लॉकडाऊनबाबत ठाकरे सरकार "वेट ॲन्ड वॉच" या भूमिकेत असल्याची माहिती आहे. रोज 5 हाजारांच्या सुमारास कोरोग्रस्त रुग्ण वाढत आहेत. प्रत्येक दिवसाच्या आकडेवारीवर सरकार कोटकोरपणे नजर ठेवत आहे. पुढच्या 15 दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्यास सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
डिसेंबरमध्ये महापरिनिर्वाणदिन, दत्त जयंती आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका आणखीनच वाढू शकतो. महापरिनिर्वाणदिनी लोकांनी घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. दत्तजयंती, नाताळ आणि नवीन वर्षासाठी खास नियमावली केली जाणार आहे.
सरकार कोणतं पाऊल उचलू शकते?
दिवाळीनिमित्त बाहेरगावी ये जा करण्याऱ्यांची संख्या मोठी आहे. वर्षाच्या अखेरीस सेलिब्रेशनसाठी बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्याही अधिकच असेल. त्यावर वेळीच निर्बंध घालण्याचा विचार सुरू आहे. लांब पल्ल्यांच्या रेल्वे आणि विमान सेवा काही कालावधीसाठी बंद करण्याचा विचार सुरू आहे. ज्या ज्या भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, त्या त्या भागात चेस द व्हायरस ही संकल्पना पुन्हा राबवली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.