मुंबई, 29 एप्रिल: राज्यात मंगळवारी कोरोनाबाधित 597 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9915 झाली आहे. राज्यात आज एकूण 32 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातले सर्वाधिक 26 मृत्यू मुंबईत झाले आहेत. म्हणजे जवळपास तासाला एक या दराने मुंबईत कोरोनाबळी जात आहेत.
मुंबई महानगरपािलका क्षेत्रात आतापर्यंत एकूण 6644 रुग्ण झाले आहेत आणि आतापर्यंत 270 कोरोनामृत्यू नोंदले गेले आहेत. शहरात 24 तासांत 475 रुग्णांची वाढ झाली.
आज राज्यात झालेल्या 32 करोना मृत्यूंपैकी मुंबईचे 26 सोडले तर पुणे शहरात 3, सोलापूर औरंगाबाद आणि पनवेल शहरात प्रत्येकी 1 मृत्यू नोंदला गेला आहे. आतापर्यंत 1593 रुग्णांना बरं करून घरी सोडण्यात आलं आहे. त्यापैकी 205 रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला.
सध्या राज्यात 1,62,860 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 10,813 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली. आजपर्यंत 1593 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.
संबंधितकोरोनाचं थैमान: देशातली ही 10 शहरं सर्वात धोकादायक, मुंबई सर्वात टॉपवर
सोलापूर जिल्ह्यातला धोकाही दिवसेंदिवस वाढत आहे. कारण रुग्णसंख्या वाढते आहे. केंद्रीय पाहणी पथक त्यामुळे आज सोलापूरच्या दौऱ्यावर होतं.
गेल्या 24 तासांमध्ये 1813 नवे रुग्ण आढळून आलेत तर 71 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशात बाधितांची एकूण संख्या 31,787 झाली आहे तर मृत्यूचा आकडा 1008वर गेला आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने आज दिली आहे.
देशात मुंबई, ठाणे, पुणे, नवी दिल्ली, अहमदाबाद, इंदूर, जयपूर, चेन्नई आणि सुरत या शहरांमध्ये 14 हजार 551 पेक्षा जास्त कोरोबाधितांची संख्या आहे. देशात असलेल्या एकूण संख्येच्या ती 51 टक्यांपेक्षा जास्त होते.
अन्य बातम्यापॉझिटिव्ह - निगेटिव्ह - पॉझिटिव्ह! कोरोनाच्या चाचणीने रुग्णाच्या आयुष्याचा खेळअमेयने मराठीत वाचलं इरफानचं ‘ते’ पत्र, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रूकोरोनाव्हायरशी लढण्यासाठी 100 वर्ष जुन्या महासाथीत डोकावण्याची गरज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.