परराज्यातल्या बसेसना महाराष्ट्रात बंदी, राज्यातल्या बसही सीमा ओलांडणार नाहीत

परराज्यातल्या बसेसना महाराष्ट्रात बंदी, राज्यातल्या बसही सीमा ओलांडणार नाहीत

इतर राज्यातील बसेसना महाराष्ट्रात बंदी करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बसेसही इतर राज्यांमध्ये जाऊ शकणार नाहीत.

  • Share this:

मुंबई 21 मार्च : कोरोना व्हायरस महाराष्ट्रात हातपाय पसरत आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी आता एसटी महामंडळानेही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आता मध्यरात्री 12 वाजतापासून इतर राज्यातील बसेसना महाराष्ट्रात बंदी करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बसेसही इतर राज्यांमध्ये जाऊ शकणार नाहीत. वाहतूक विभागाने हे आदेश जारी केले आहेत. वाहतूक आयुक्त शेखर चन्ने यांनी हे आदेश काढले आहेत.

दरम्यान, कोरोनाचा प्रसार आणि जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या सर्व सीमा बंद केल्या अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. ते म्हणाले, राज्याच्या सर्व सीमा सील केले असल्या तरी सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा चालूच राहील. रविवारी सर्व बार, रेस्टारंट, खाद्य पदार्थांचे गाडे बंद राहतील. याशिवाय 31 मार्च पर्यंत सर्व उत्सव, नाट्यप्रयोग व क्रिडा स्पर्धा व सोहळे रद्द केले आहेत. सर्व शिक्षकांना 31 मार्चपर्यंत सुटी दिली आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

शिवसेना खासदारांनी घेतली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट, केली 'ही' मागणी

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 63 वर पोहोचली आहे. कोरोनाचे संशयीत रुग्ण महाराष्ट्राच्या हद्दीतून तेलंगणात येऊ नये यासाठी महाराष्ट्र-तेलंगणा सीमा सील करण्याचा निर्णय तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी घेतला आहे. तेलंगणा सरकारने सीमेवर तब्बल अठरा चेकपोस्ट उभारले असल्याची माहिती मिळाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी केली PM मोदींकडे विशेष मागणी

महाराष्ट्राला लागुन असलेल्या सगळ्या राज्याच्या सीमेवर असे चेकपोस्ट नाहीत, त्यामुळे इतर राज्यातून कोरोनाचे संशयीत रुग्ण महाराष्ट्रात आले तर काय होईल, असा प्रश्न सीमावर्ती भागातल्या जनतेला आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारशी तेलंगणाचे मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2020 07:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading