मुंबई 24 जुलै: राज्यात आजही उच्चांकी कोरोना रुग्णांची भर पडली. गेल्या 24 तासांत 9615 रुग्ण सापडले आहेत. तर 278 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांचीं संख्या 3,51,117 वर गेली आहे. तर Active रुग्णांचा आकडा 1,43, 714 एवढा झाला आहे. तर 5714 जणांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यातल्या मृत्यूची एकूण संख्या ही 13 हजार 132 एवढी झाली आहे. मुंबईत आज 1057 नवे रुग्ण सापडले. तर 54 जणांचा मृत्यू झाला.
आज ठाणे महापालिका क्षेत्रात 285 कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 17150 झाली आहे.
पुणे विभागातील 44 हजार 825 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 77 हजार 826 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 30 हजार 803 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 849 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.60 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
दरम्यान, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद इथं कोरोनाचा वाढता आलेख आता सपाट झाला आहे. मात्र याचा अर्थ कोरोनाचा धोका टळला असा नाही, पावसामुळे हा धोका पुन्हा वाढू शकतो, अशी शक्यता दिल्लीतील एम्सच्या संचालकांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत कोरोनाचा आलेख झाला सपाट; पण सावधान पावसामुळे पुन्हा वाढू शकतो धोका
भारतात कोरोनाव्हायरसने सर्वोच्च बिंदू (peak) गाठला आहे का? कोरोनाचा आलेख कसा आहे आणि पावसाळ्यात कोरोनाचा धोका किती आहे. याबाबत दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी न्यूज 18 ला माहिती दिली आहे.
खुलेआम काळाबाजार! 1500 रुपये द्या आणि अवघ्या 15 मिनिटांत मिळवा ई-पास
डॉ. गुलेरिया म्हणाले, "भारतातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या कालावधीत कोरोना सर्वोच्च बिंदू गाठेल. दिल्लीमध्ये सध्या अशी परिस्थिती आहे, जिथं कोरोना आलेखाची वक्ररेषा समांतर होऊ लागली आहे. मुंबई, अहमदाबाद आणि दक्षिणेकडील काही भागात कोरोनाचा आलेख झुकू लागला आहे. या ठिकाणी कोरोनाचं प्रमाण सर्वोच्च टोकावर पोहोचलं आणि आता तो खाली घसरू लागलं आहे. मात्र प्रकरणं कमी झाली तरी आपण त्याला गांभीर्याने घ्यायला हवं"
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.