• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • ...आणि कोरोनाबाधिताचे घर तोडून पोपटाची केली सुटका!

...आणि कोरोनाबाधिताचे घर तोडून पोपटाची केली सुटका!

Sanitary workers disinfect the Warszawa Zachodnia (Warsaw Western) coach station at the end of the day in a new routine intended to fight the spread of the coronavirus, in Warsaw, Poland, Wednesday, March 25, 2020. For most people, the new coronavirus causes mild or moderate symptoms, such as fever and cough that clear up in two to three weeks. For some, especially older adults and people with existing health problems, it can cause more severe illness, including pneumonia and death. (AP Photo/Czarek Sokolowski)

मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. परंतु, एका कोरोनाबाधिताला घरी पोपट पाळणे महागात पडले आहे.

  • Share this:
मुंबई, 04 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. परंतु, एका कोरोनाबाधिताला घरी पोपट पाळणे महागात पडले आहे. घडलेली हकीकत अशी की, आज मुंबईतील भांडूप येथील खिंडीपाडा इथं एका कुटुंबात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला होता. त्यांना पुढील उपचारासाठी पवई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. खबरदारी म्हणून पालिका प्रशासनाने हा व्यक्ती राहत असलेला परिसर सील करून टाकला होता. तसंच रुग्णाचे घर मुंबई महानगरपालिकेनं तीन दिवस सील केले होते. हेही वाचा -पंढरपुरातील चैत्र वारी सोहळा रद्द, राज्य सरकारचा मोठा निर्णय़ परंतु, या रुग्णाच्या घरात एक पोपट असल्याची माहिती समोर आली. ही माहिनी वनविभागाला कळवण्यात आली. त्यानंतर वनविभागाच्या वरिष्ठांच्या आदेशाने वन विभागाची टीम कोरोनाबाधित रुग्णाच्या घरी पोहोचली.  यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस कर्मचारी, एनजीओ पॉस मुंबई एसीफचे सुनिष सुब्रमण्यन व वन विभागाचे कर्मचारी संतोष भागणे, शीघ्र बचाव  दल, पंकज कुंभार, वनरक्षक व संतोष ठाकरे, वाहन चालक आधी उपस्थितीत होते. वनविभागाचे आणि मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त कार्यवाही करून घराचे कुलूप तोडले आणि  घरात पिंजऱ्यातील पोपटाची सुखरूप सुटका करून घेतली. या पोपटाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतल आहे. सध्या या पोपटाला मुंबई एसपीसीए, परेल इथं पुढील उपचार आणि देखभालीसाठी दाखल करण्यात आले आहे. अद्याप, कोरोनाबाधित रुग्णावर वन्यप्राणी पाळण्याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
Published by:sachin Salve
First published: