'त्यांच्या शौर्याला सलाम', कोरोनामुळे शहीद झालेल्या 2 पोलीस कॉन्स्टेबलना बिंग बींगकडून श्रद्धांजली

'त्यांच्या शौर्याला सलाम', कोरोनामुळे शहीद झालेल्या 2 पोलीस कॉन्स्टेबलना बिंग बींगकडून श्रद्धांजली

बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करून शहीद झालेल्या दोन्ही पोलिसांना श्रद्धांजली वाहिली आहे.

  • Share this:

मुंबई, 26 एप्रिल : कोरोनाचा थैमान सुरू असताना महाराष्ट्रात दु:खद घटना घडली आहे. दोन पोलिसांची कोरोना विरुद्धची लढाई अपयशी ठरले आहे. कोरोनाशी लढा देताना दोन पोलीस शहीद झाले. मुंबई पोलिसांनी या संदर्भातील माहिती ट्वीट करून दिली आहे. मुंबई पोलिसांच्या ट्वीटवर बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करून शहीद झालेल्या दोन्ही पोलिसांना श्रद्धांजली वाहिली आहे.

'ही अत्यंत दु:ख बातमी आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र ते आपल्यासाठी काम करत आहेत. त्यांच्या या शौर्याला सलाम. 'असं ट्वीट करून बिग बींनी शहीद पोलीस चंद्रकांत यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हे वाचा-पुण्यात का वाढत आहे कोरोना रुग्णांची संख्या? महत्त्वपूर्ण कारण आलं समोर

कोरोनाशी लढा देणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाबसमोर आली असून नवी मुंबईत आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 2 पोलिसांचा मृत्यू झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. नवी मुंबईत पोलीस हवालदाराला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली होती. 23 एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर नवी मुंबईतील MGM रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे 04. 40 च्या सुमारास उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, 25 एप्रिल रोजी मुंबईत कोरोनामुळे पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. मुंबईत पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. मृत पोलीस कॉन्स्टेबल 57 वर्षांचा असून वाकोला पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मृत कॉन्स्टेबलच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.

हे वाचा-कोरोनामुळे 'या' भारतीय खेळाडूचा मृत्यू, अखेरचा श्वास घेताना शेवटचा शब्द होता....

First published: April 26, 2020, 2:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading