मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कोरोना इफेक्ट, मुंबईकरांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

कोरोना इफेक्ट, मुंबईकरांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

कोरोना व्हायरसचा धोका वाढत असताना राज्य सरकारनं मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसचा धोका वाढत असताना राज्य सरकारनं मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसचा धोका वाढत असताना राज्य सरकारनं मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
मुंबई, 16 मार्च : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 38 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखीन 4 रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत 8 तर नवी मुंबईत एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. त्यामुळे खबरदारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. या पाठोपाठ आता पब आणि डिस्कोही बंद ठेवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारनं घेतला आहे. कोरोना व्हायरसचा धोका वाढत असताना राज्य सरकारनं मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी मुंबईमध्ये गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. इतकच नाही तर प्रशासनाकडून वारंवार जनजागृती कऱण्यात येत आहे. मुंबईतील गर्दी लक्षात घेता आणि कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये संसर्ग टाळण्यासाठी बायोमॅट्रीक अटेंडस बंद करण्यात आले आहेत. अनेक ऑफिसेसना घरून काम करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोनाचे राज्यात आढळलेले रुग्ण पुणे - 16 नागपूर - 4 यवतमाळ - 3 ठाणे - 1 अहमदनगर - 1 कल्याण 1 पनवेल - 1 नवी मुंबई - 1 मुंबई - 8 नवी मुंबई- 1 औरंगाबाद - 1 COVID-19 Tracker वर जगभरातल्या कोरोनाव्हायरस संसर्गाची माहिती देण्यात आली आहे. bing.com/covid यावर क्लिक केल्यावर हा ट्रॅकर ओपन होईल. ही बातमी अपलोड होण्याच्या वेळी या ट्रॅकरवर कोरोनाग्रस्तांचा जागतिक आकडा 169,657 होता. त्यापैकी 85,379 लोक अद्याप या व्हायरसविरोधात लढत आहेत. 77,761 लोकांना संसर्ग झाला होता, पण आता ते बरे झाले आहेत आणि जगभरात कोविड -19 मुळे 6,517 मृत्यू झाल्याची नोंद Microsoft COVID-19 Tracker ने केलेली आहे. भारतातल्या दोघांच्या मृत्यूचा यात समावेश आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे.
First published:

पुढील बातम्या