Home /News /mumbai /

कोरोनाने मार्ग बदलला? आता ग्रामीण भागातून शहराकडे होत आहे वेगाने संसर्ग

कोरोनाने मार्ग बदलला? आता ग्रामीण भागातून शहराकडे होत आहे वेगाने संसर्ग

Coronavirus : कोरोनाचा प्रभाव हा ग्रामीण भागाकडून शहराकडे वाढत असल्याचे दिसत आहे.

मुंबई, 6 मार्च : गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या संख्या सातत्याने वाढत आहे. राज्यात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाची संख्या दहा हजारावर पोहोचली आहे. राज्यात गेल्या आठवड्यात प्रत्येक दिवशी आठ हजार रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा प्रभाव हा ग्रामीण भागाकडून शहराकडे (Rural Areas To Cities) वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात सापडला. त्यानंतर पुणे, मुंबई, ठाणे ही शहरं कोरोनाची हॉटस्पॉट ठरली. या शहरात कोरोनाचा कहर चांगलाच पाहायला मिळाला. कालांतराने कोरोनाचा राज्यभर फैलाव झाला. राज्य आणि महापालिका प्रशासनाचे प्रयत्न, पोलिसांचा धाक आणि नागरिकांच्या सतर्कता यामुळे आठ महिन्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली. आशियातील सर्वात मोठी धारावी झोपडपट्टी अथवा वरळी, त्याच बरोबर पुणे येथील जम्बो कोविड सेंटर रुग्ण कमी झाल्याने बंद करण्यात आले. कालांतराने अनलॉक सुरू झालं आणि हळूहळू व्यवहार सुरळीत झाले. असं असलं तरी मुंबई, पुणे, ठाण्यात कोरोना नियमांची अंमलबजावणी सुरूच होती. या मानाने कोरोनाला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये ग्रामीण महाराष्ट्रात उदासीनता दिसून आली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्न समारंभात होणारी शेकडोच्या उपस्थिती तसंच अंत्यविधीनिमित्र होणाऱ्या भेटीगाठी या संक्रमणासाठी सर्वात मोठं कारण ठरली. हेही वाचा - पुन्हा कोरोनाचा धोका? महाराष्ट्रातील प्रवाशांवर शेजारील राज्याने लावले निर्बंध मास्क आणि हाताची स्वच्छता यात झालेली बेफिकिरी ग्रामीण भागाला मारक ठरली. विदर्भात नागपूर, अमरावती, वर्धा येथे पुन्हा संचारबंदी लावण्याची सक्ती करावी लागली. जळगाव आणि मालेगावात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं. कोरोनाचा पहिल्या टप्यात शहाराकडून ग्रामीण भागात तर दुसऱ्या टप्यात ग्रामीण भागाकडून शहरी भागात फैलाव झाल्याचं दिसत आहे. राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येत सर्वात मोठी चिंतेची बाब मालेगाव आणि धारावी यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढला आहे. याच भागात वाढलेली मृत्यूसंख्या शासनाची डोकेदुखी बनली होती. आता याच भागात पुन्हा कोरोनाची वाढ होत आहे. आपण स्वयंशिस्त पाळली नाही तर हा आकडा वाढायला वेळ लागणार नाही.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Corona hotspot, Corona updates, Coronavirus, Covid19, India, Wellness

पुढील बातम्या