VIDEO : लॉकडाऊनमध्ये नवी मुंबईत भाजी विक्रेत्या महिला आणि पोलिसांमध्ये जुंपली

VIDEO : लॉकडाऊनमध्ये नवी मुंबईत भाजी विक्रेत्या महिला आणि पोलिसांमध्ये जुंपली

भाजी विकणाऱ्यांना पोलिसांनी हुसकवून लावलं तरीही न ऐकल्यानं शेवटी त्यांच्या हातगाड्या जप्त करून कारवाई कऱण्याचा इशारा दिला.

  • Share this:

नवी मुंबई, 18 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यात लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजारहून अधिक आहे. त्यामुळे अनेक हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणांना पोलिसांनी सील केलं आहे. तिथे भाजी विक्री अथवा किराणा माल विकण्यास बंदी घालण्यात आली आहे.

नवी मुंबईतील मानखुर्द परिसरात लॉकडाऊनचं उल्लंघन करून भाजी विकणाऱ्यांना पोलिसांनी हुसकवून लावलं तरीही न ऐकल्यानं शेवटी त्यांच्या हातगाड्या जप्त करून कारवाई कऱण्याचा इशारा दिला. याच दरम्यान भाजी विक्रेत्या महिला आणि पोलीस यांच्यात शाब्दिक वाद झाला आणि त्याच रुपांतर झटापटीत झालं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे वाचा-Lockdown 2.0-देशातील 45 टक्के अर्थव्यवस्था 20 एप्रिलपासून होणार रिस्टार्ट

अनेक ठिकाणी भाजी घेण्यासाठी लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत हे लक्षात आल्यानं भाजी मार्केट बंद करावे लागले आहेत. ठाणे, भिवंडीत भाजी घेण्यासाठी लोकांचा गराडा होतो त्यामुळे तिथले मार्केट बंद झाल्यानंतर आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्थानिक नागरिकही पोलिसांसोबत वाद घालण्यासाठी पुढे आले तिथे झटापटही झाली पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. मुंबईत कोरोनाचा संसर्ग वेगानं पसरू नये म्हणून सोशल डिन्सन्सिंग ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे. यासोबतच लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे.

हे वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

First published: April 18, 2020, 1:35 PM IST

ताज्या बातम्या