CISF जवानाच्या घरात घुसला कोरोना; उरणमध्ये पहिल्यांदाच आढळले 2 रुग्ण

CISF जवानाच्या घरात घुसला कोरोना; उरणमध्ये पहिल्यांदाच आढळले 2 रुग्ण

याआधी पनवेलमध्ये 10 जवानांना कोरोनाची लागण झाल्यानं JNPT मधील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 12 एप्रिल : उरणमध्ये पहिल्यांदाच दोन कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हॉटेल व्यवसायिकाच्या मुलाला आणि CISF जवानाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. CISF जवान JNPT मध्ये आहे कार्यरत आहे. JNPT मध्ये रुग्ण आढळल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. याआधी पनवेलमधील कळंबोलीच्या CISFच्या कॉलनीत राहणाऱ्या 10 जवानांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती 4 एप्रिल रोजी मिळाली होती. नवी मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईसह उपनगरांमध्येही कोरोनाचा संसर्ग वेगानं होत आहे.

मुंबईतील कोरोनाचं संकट आणखी गडद

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. अशातच धारावीमध्ये पुन्हा 15 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनासमोरील ताण आणखीनच वाढला आहे. विशेष म्हणजे राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्पेक्स येथे विलगीकरण करण्यात आलेल्यांमधील 9 जणांचा यामध्ये समावेश आहे.

हे वाचा-महाराष्ट्राची मान शरमेने खाली; पोलिसांवर पुन्हा हल्ला, 4 जण गंभीर जखमी

धारावीत नव्याने कोरोनाबाधित आढळलेले सर्वजण हे केईएम रुग्णालयात मृत्यू झालेल्या सोशल नगरमधील रुग्णाच्या तसेच मदिना नगरमधील करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते. आज धारावीमध्ये आणखी 15 रुग्ण आढळल्याने धारावीतील रुग्णांची एकूण संख्या 43 एवढी झाली आहे.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तब्बल 134 रुग्णांची संख्या वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 113 रुग्ण हे मुंबईतच आढळले आहे. राज्यात कोरोना व्हायरसने घातलेला विळखा वाढतच चालला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्याही 1895 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात मुंबई, पुणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

हे वाचा-वादातून महिलेने उचललं धक्कादायक पाऊल, पोटच्या लेकरांना दिलं गंगेत फेकून

First published: April 12, 2020, 3:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading