दुबईहून प्रवास करून आलेले पुण्यातील 2 प्रवासी कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरू आहे. या रुग्णांची मुलगी तसेच ज्या ओला टॅक्सीने या रुग्णांनी मुंबई-पुणे प्रवास केला. टॅक्सी ड्रायव्हर आणि त्यांचा विमानातील सहप्रवासी हे तीन निकटसहवासित देखील कोरोना बाधित आढळले आणि आता या रुग्णांसोबतचे मुंबईतील 2 सहप्रवासीदेखील कोरोना बाधित असल्याचा निर्वाळा कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 7 झाली आहे. संबंधित - सावधान! मुंबई, पुण्यात 'कोरोना', तुम्हीही होऊ शकता व्हायरसचे शिकार; असा करा स्वत:चा बचाव सध्या पुण्यात 18 जण तर मुंबईत 15 जण भरती आहेत. या शिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि वाय सी एम रुग्णालय पिंपरी चिंचवड येथेही संशयित रुग्ण भरती आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 349 जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व 312 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत, त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर 7 जण पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे. संबंधित - तुम्हाला कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसली तर... काय करायचं, कुठे जायचं जाणून घ्याPublic Health Department of Maharashtra: 2 more patients admitted at a Mumbai Hospital have tested positive for #Coronavirus. There are 7 positive cases in the state now.
— ANI (@ANI) March 11, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus