गृहमंत्री अनिल देशमुखांसमोर पोलीस निरीक्षकाला कोसळलं रडू, पाहा VIDEO

गृहमंत्री अनिल देशमुखांसमोर पोलीस निरीक्षकाला कोसळलं रडू, पाहा VIDEO

सहकाऱ्याच्या मृत्यूनंतर पोलीस निरीक्षकालाही कोसळलं रडू, गृहमंत्र्यांनी असा दिला धीर.

  • Share this:

मुंबई, 17 मे : देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगानं पसरत आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पोलीस अहोरात्र आपलं कर्तव्य बजावत आहे. गरज पडेल तिथे स्वत: जीव धोक्यात घालून नागरिकांची मदत करत आहेत. कर्तव्यदक्ष पोलिसांनाही आता कोरोनाचा धोका जास्त जाणवायला लागला आहे. मुंबई पोलीस दलातील जवळपास 7 पोलिसांचा तर राज्यात 11 पोलिसांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर एक हजारहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाले आहे.

कोरोनामुळे मुंबईत सर्वात तरुण पोलिसानं आपले प्राण गमवले. शाहूनगर पोलीस ठाण्याचे 32 वर्षीय सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं शनिवारी सकाळी निधन झालं. या घटनेनंतर पोलीस दलात चिंतेचं वातावरण होतं. या घटनेनंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी शाहूनगर पोलीस ठाण्याला भेट दिली आणि तिथल्या पोलीसांना धीर देत मनोबल वाढवलं. त्याच दरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सहकाऱ्याच्या निधानानंतर पोलीस निरीक्षकाला अश्रू अनावर झाल्यानं गृहमंत्र्यांसमोर रडू कोसळलं.

राज्याचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी पोलीस निरीक्षकाचं सांत्वन केलं. अचानक भावनांची लाट उसळल्यानं अश्रू अनावर झाले आणि रडू कोसळल्यानं शांतता पसरली. गृहमंत्र्यांनी धीर देत शाहूनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांचं मनोबल वाढवलं आहे.

राज्यातील पोलीस दलात जवळपास 1 हजारहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी जवळपास 600 पोलीस हे मुंबईचे असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पोलीस खात्यासह त्यांच्या कुटुंबियांमध्येही चिंतेचं वातावरण आहे. कोरोनाचा लढाईत कर्तव्यदक्ष आणि मदत करणाऱ्या या पोलिसांचा मोलाचा वाटा आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 17, 2020, 7:40 AM IST

ताज्या बातम्या