व्यथा मातेची! कोरोनाच्या महासंकटात कर्तव्य बजावण्यासाठी तान्हुल्याचं अंगावरचं दूध केलं बंद

व्यथा मातेची! कोरोनाच्या महासंकटात कर्तव्य बजावण्यासाठी तान्हुल्याचं अंगावरचं दूध केलं बंद

ड्युटीवरून घरी परतल्यानंतर मात्र आपल्या चिमुकल्याला हृदयाशी कवटाळताना आणि स्तनपान करताना या मातेच्या काळजाचा ठोका चुकतो.

  • Share this:

मुंबई, 01 मे : कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी जीवाची पर्वा न करता महिला पोलीस आणि आरोग्य सेवा कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहे. हे कर्तव्य बजावत असताना आपल्या कुटुंबीयांना या व्हायरसपासून लांब ठेवणं आणि आपल्यामुळे त्यांच्यापर्यंत हा संसर्ग पोहोचू नये यासाठी दोन भूमिका बजावाव्या लागत आहेत. अशावेळी सर्वात मोठी अडचण येते ती तान्हा बाळाला जन्म दिलेल्या कर्तव्यदक्ष मातेची. साधारण 6 महिन्यांपेक्षा अधिक झाले की त्याला घरी ठेवून आई आपलं कर्तव्य बजावण्यासाठी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जात आहे.

कामावरून घरी परतल्यानंतर मात्र आपल्या चिमुकल्याला हृदयाशी कवटाळताना आणि स्तनपान करताना या मातेच्या काळजाचा ठोका चुकतो. याचं कारण म्हणजे आपल्या चिमुकल्याला कोरोनाचा धोका पोहोचू नये किंवा त्याच्यापर्यंत स्तनपानातून किंवा जवळ घेतल्यानं संसर्ग होऊ नये म्हणून मनात भीतीही असते.

पोलीस कर्मचारी म्हणून ड्युटी निभावणाऱ्या मातेनं आपल्या तान्ह्या बाळाला कोरोनाच्या भीतीनं स्तनपान बंद केलं. मुलालाही सवय व्हावी आणि त्रास होऊ नये यासाठी बाळ आणि या महिलेनं उपचार सुरू केले आहेत. मुंबई पोलीस दलात ही महिला कार्यरत आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी या मातेला बाळंतपणानंतर काही महिन्यांत या मातेला कामावर रुजू व्हावं लागलं या मातेनं आपली व्यथा मांडली आहे.

हे वाचा-कोरोनावर मोठ्या हिम्मतीनं केली मात, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं

हे वाचा-काळजाचा तुकडा मृत्यूशी झुंज देतोय आणि तरीही पोलीस बाप बजावतोय कर्तव्य

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 1, 2020, 11:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading