Home /News /mumbai /

धक्कादायक! सॅनिटायझर लावल्यानं रुग्णालयात पोहोचला तरुण, 'हे' आहे कारण

धक्कादायक! सॅनिटायझर लावल्यानं रुग्णालयात पोहोचला तरुण, 'हे' आहे कारण

सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे त्वचेचे विकार झाल्याच्या घटनाही पुढे आल्याने डॉक्टरांनीही इशारा दिला होता.

सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे त्वचेचे विकार झाल्याच्या घटनाही पुढे आल्याने डॉक्टरांनीही इशारा दिला होता.

संसर्गापासून संरक्षण करणारं सॅनिटायझर लावल्यानं तरुणाला त्रास झाला आहे.

    मुंबई, 16 जुलै: कोरोनापासून संरक्षण आणि संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. मुंबईत मात्र सॅनिटायझरच्या वापरामुळे एका तरुणाला रुग्णालय गाठण्याची वेळ आली. संसर्गापासून संरक्षण करणारं सॅनिटायझर लावल्यानं तरुणाला त्रास झाला आहे. ही घटना मुंबईतील अंधरी परिसरात घडली आहे. 43 वर्षीय व्यक्ती बँकेत गेला असताना त्याला तिथे सॅनिटाइझ करण्यात आलं. त्यावेळी त्या रुग्णाला त्रास झाला. चेहरा पूर्ण लाल पडला आणि हृदयाचे ठोकेही वाढल्यानं त्याला तातडीनं अंधेरीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना अँटी-एलर्जिक तसेच ईसीजी देखील काढण्यात आला. एका तासाच्या आत त्याची प्रकृती स्थीर झाली. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अविनाश डिसोझा यांना कॉल करण्यात आला. तपासणी दरम्यान असे आढळले की गेल्या 3 वर्षांपासून या व्यक्तीवर अल्कहोल सोडण्यासंदर्भात उपचार सुरू आहेत. या व्यक्तीला दारूचं व्यसन होतं आणि त्यासाठी जे उपचार सुरू होते त्याचदरम्यान अल्कहोल जास्त प्रमाणात असलेलं सॅनिटाइझर वापरल्यानं त्रास होऊ लागला होता. डॉक्टर डिसूझा यांनी दिलेल्या माहितीनुसार दारूची सवय सुटण्यासाठी रुग्णाला डाइसल्फीरम औषधाचा वापर केला जातो. पण या दरम्यान अल्कहोल असलेलं सॅनिटायझर वापरल्यानं अशा प्रकारे रिअॅक्शन होण्याची ही पहिलीच घटना असल्याचं सांगण्यात येत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या