Home /News /mumbai /

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झाली 490; मुंबईत सर्वाधिक रुग्ण वाढले

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झाली 490; मुंबईत सर्वाधिक रुग्ण वाढले

राज्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत 26 मृत्यू झाले आहेत. त्यापैकी मुंबईतील १९ जणांचा समावेश आहे.

    मुंबई, 3 एप्रिल : कोरोनाव्हायरचे महाराष्ट्रात आज दिवसअखेर 490 रुग्ण झाले आहेत. गेल्या 24 तासांत 67 नवे रुग्ण सापडले. त्यातले सर्वाधिक मुंबईत सापडले. त्यानंतर पुण्यात कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली आहे. दिवसभरात मुंबईत 43 कोरोनाग्रस्त दाखल झाले. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या 278 झाली आहे. पुण्यात आज 9 रुग्ण सापडले तर नवी मुंबईत 8 कोरोनाग्रस्त सापडले.  राज्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत 26 मृत्यू झाले आहेत. त्यापैकी मुंबईतील १९ जणांचा समावेश आहे. दिवसभरात सापडलेल्या रुग्णांची विभागवार यादी अशी : मुंबई 43 पुणे 9 नवी मुंबई 8 नगर 3 पालघर 1 वाशिम 1 कल्याण डोंबिवली 1 रत्नागिरी 1 हेही वाचा...सलाम! दगडफेकीत जखमी होऊनही महिला डॉक्टर दुसऱ्याच दिवशी परतल्या ड्यूटीवर राज्यात एकूण 490 कोरोनाचे रुग्ण दाखल झाले. त्यातले 20 बरे झाले आहेत. मुंबई – 278 पुणे (शहर व ग्रामीण भाग)– 70 मुंबई वगळून मंडळातीत इतर मनपा व जिल्हे 54 सांगली – 25 नागपूर – 16 अहमदनगर – 20 बुलढाणा- 5 यवतमाळ – 4 सातारा – 3 औरंगाबाद – 3 कोल्हापूर – 2 रत्नागिरी – 2 वाशिम-1 सिंधुदुर्ग – 1 गोंदिया – 1 जळगाव- 1 नाशिक – 1 उस्मानाबाद -1 इतर राज्य (गुजरात) – 01 खरा धोका एप्रिलअखेरी भारतात या साथीचा कहर (Peak of pendemic) या महिन्याच्या अखेरीला किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे लॉक डाउन संपलं तरी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेच लागणार आहेत. इटली आणि स्पेनमध्ये जे आत्ता घडत आहे तसा वेगाने फैलाव आणि वाढता मृत्युदर रोखायचा असेल तर घरात राहणं याला पर्याय नाही, असं तज्ज्ञ सांगतात. गर्दी टाळली तरच या विषाणूचं संक्रमण आटोक्यात राहील. भारतासारख्या देशात लोकसंख्या आणि राहण्याची पद्धत लक्षात घेता कोरोनाची साथ उग्र रूप धारण करू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मुंबई एअरपोर्टवर कर्तव्य बजावणाऱ्या 11 जवानांना 'कोरोना' मुंबई विमानतळावर कर्तव्य बजावणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) आणखी 6 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यापूर्वी 5 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले होते. एकूण 11 जवानांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मोदींच्या ‘त्या’ घोषणेनंतर ऊर्जा मंत्रालय हादरलं, वीज पुरवठाच होऊ शकतो ठप्प काही दिवसांपूर्वी मुंबई एअरपोर्टवर कार्यरत असलेल्या सीआयएसएफच्या एका जवानाचा कोरोनाची लागण झाली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. नंतर तो नवी मुंबईतील कळंबोली येथील कॉलनीत गेला. नंतर इतर 10 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, पूर्ण पनवेलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 झाली आहे. खरं की खोटं : प्रखर सूर्यप्रकाश आणि UV किरणं कोरोनाला नष्ट शकतात का?
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या