Home /News /mumbai /

सावधान मुंबई! कोरोनाचे आणखी 4 रुग्ण पॉझिटिव्ह, राज्यातील रुग्णांची संख्या 38 वर

सावधान मुंबई! कोरोनाचे आणखी 4 रुग्ण पॉझिटिव्ह, राज्यातील रुग्णांची संख्या 38 वर

राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

    मुंबई, 16 मार्च : राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखीन 4 रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती मिळत आहे. आता राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 37वर गेली आहे. मुंबईमध्ये तीन आणि नवी मुंबईत एक रुग्ण आढल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्ग लक्षात घेता शाळा, महाविद्यालयं, चित्रपट गृह बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यापाठोबात आता मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असल्यानं मुंबईकरांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पुणे - 16 नागपूर - 4 यवतमाळ - 2 ठाणे - 1 अहमदनगर - 1 कल्याण 1 पनवेल - 1 नवी मुंबई - 1 मुंबई - 8 नवी मुंबई- 1 औरंगाबाद - 1 महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पुण्यात आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर हा व्हायरस वेगाने पसरू शकतो. शहरात या व्हायरस अजून पसरू नये, म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भागांमध्ये जमावबंदी लागू होऊ शकते. कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात राज्यातल्या सरकारी आणि खासगी सर्व शाळांचा समावेश आहे. येत्या 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. हे वाचा-एका क्लिकवर मिळवा कोरोनाबाबत अचूक माहिती, भारताने तयार केली खास वेबसाईट
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या