• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मुंबईतून आली धक्कादायक बातमी; प्रौढांचं लसीकरण सुरू होताच लहान मुलांना शिकार बनवतोय कोरोना

मुंबईतून आली धक्कादायक बातमी; प्रौढांचं लसीकरण सुरू होताच लहान मुलांना शिकार बनवतोय कोरोना

दुसरी लाट म्हणजे त्सुनामी ठरेल 
मला काहीशी नाराजी व्यक्त करायची आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,  आपण कोरोना रुग्णांचे आकडे खाली आणले पण दिवाळी आणि नंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे तसे होताना दिसत नाही. कोरोनाचे संकट नाहीसे झालेले नाही तर पाश्चिमात्य देशात बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन लावले गेले आहे. दिल्लीत दुसरी तिसरी लाट आली आहे.  गुजरातमध्ये रात्रीची संचारबंदी लावली आहे. ही नुसती लाट नाही तर त्सुनामी आहे कीकाय असे वाटतेय. आपल्याकडे वैद्यकीय यंत्रणा तयार आहे पण त्यावर किती ताण टाकायचा याला काही मर्यादा आहेत. कृपा करून सगळं उघडे केले म्हणजे कोरोना गेला आहे असा अर्थ होत नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दुसरी लाट म्हणजे त्सुनामी ठरेल मला काहीशी नाराजी व्यक्त करायची आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण कोरोना रुग्णांचे आकडे खाली आणले पण दिवाळी आणि नंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे तसे होताना दिसत नाही. कोरोनाचे संकट नाहीसे झालेले नाही तर पाश्चिमात्य देशात बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन लावले गेले आहे. दिल्लीत दुसरी तिसरी लाट आली आहे. गुजरातमध्ये रात्रीची संचारबंदी लावली आहे. ही नुसती लाट नाही तर त्सुनामी आहे कीकाय असे वाटतेय. आपल्याकडे वैद्यकीय यंत्रणा तयार आहे पण त्यावर किती ताण टाकायचा याला काही मर्यादा आहेत. कृपा करून सगळं उघडे केले म्हणजे कोरोना गेला आहे असा अर्थ होत नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.

45 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचं आजपासून लसीकरण (above 45 years age corona vaccination) सुरू झालं आहे. हा मोठा दिलासा एकिकडे मिळत असताना दुसरीकडे मात्र लहान मुलांमधील कोरोनाची (Coronavirus in children) प्रकरणं वाढल्याने चिंता वाढली आहे.

  • Share this:
मुंबई, 01 एप्रिल : गेल्या वर्षी लहान मुलांना कोरोनाव्हायरसची (Coronavirus in children) लागण होण्याची प्रकरणं खूपच कमी होती. पण या वर्षी कोरोनाचा नवा स्ट्रेनही दिसून आला आणि कोरोनाचं हे नवं रूप मात्र लहान मुलांसाठी (Coronavirus in kids) धोकादायक ठरत असल्याचं दिसून आलं आहे. एकिकडे प्रौढांचं कोरोना लसीकरण (Corona vaccination above 45 years age) सुरू झालेलं असताना आता दुसरीकडे कोरोनाने लहान मुलांना (Corona affected child) आपलं शिकार बनवायला सुरुवात केली आहे. नुकतीच मुंबईतील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण तर वाढलंच आहे. शिवाय मुलांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. गेल्या वर्षी लहान मुलांसाठी असलेला कोव्हिड वॉर्ड ओस पडला होता. पण आता मात्र तिथं रुग्ण येऊ लागले आहेत. नायर रुग्णालयात सध्या 36 कोरोनाबाधित मुलांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 13 मुलं मोठी तर 23 नवजात बालकं आहे. याचाच अर्थ नवजात बाळांमध्ये कोरोनाचं प्रमाण सर्वाधिक आहे. हे वाचा - लहान मुलांनाही कोरोना लस दिली जाणार? लसीकरणादरम्यान समोर आली मोठी माहिती लहान मुलांमधील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आता त्यांनाही लवकरात लवकर कोरोना लस देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत अनेक लस उत्पादक कंपन्यांचं ट्रायल सुरू आहे. यूएसमधील फायझर कंपनीने आपल्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अहवालही जारी केला आहे. फायझर आणि बायोएनटेक कंपनीची कोरोना लस 12 ते 15 वयोगटातील मुलांमध्ये 100 टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्यासाठी आपात्कालीन मंजुरी द्यावी, अशी मागणी लवकरच एफडीएकडे करणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. हे वाचा - कोरोना लस घेतल्यानंतर अर्धा तास केंद्रावरच थांबणं गरजेचं, अन्यथा गंभीर परिणाम फायझरने आता 6 महिने ते 11 वर्षे वयोगटातील मुलांवर कोरोना चाचणी सुरू केल्याचं गेल्या आठवड्यात सांगितलं. फायझरशिवाय यूएसमधील मॉडर्नाने डिसेंबर, 2020 मध्ये 12 ते 17 वयोगटातील मुलांवर कोरोना चाचणी सुरू केली. तर आता 12 पेक्षा कमी वयाच्या मुलांवर चाचणी केली जात असल्याचं  16 मार्च, 2021 ला सांगितलं. जॉन्सन अँड जॉन्सनने तर लहान मुलांवर चाचणी केल्यानंतर आता बाळ आणि नवजात बालकांवरही चाचणी करण्याची योजना आखली आहे.
Published by:Priya Lad
First published: