मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईत कोरोनाचा महाविस्फोट; 24 तासांतील थरकाप उडवणारी आकडेवारी समोर

मुंबईत कोरोनाचा महाविस्फोट; 24 तासांतील थरकाप उडवणारी आकडेवारी समोर

राज्यात कोरोनाचा आलेख सध्या सध्या घसरणीला लागला आहे. मात्र पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

राज्यात कोरोनाचा आलेख सध्या सध्या घसरणीला लागला आहे. मात्र पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

coronavirus in mumbai : मुंबईत कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे.

मुंबई, 24 मार्च : मुंबईत कोरोनाचा (coronavirus in mumbai) महाविस्फोट झाला आहे. आज कोरोना रुग्णांचा आलेख (coronavirus cases in mumbai) वेगाने वर गेला आहे. 24 तासांत रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. कोरोना रुग्णांनी दिवसभरात पाच हजारांचा टप्पा पार केला आहे.

बुधवारी दिवसभरात मुंबईत 5067 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच 21 मार्चला 3,775 नवे कोरोना रुग्ण सापडले. तर  23 मार्चला 3512 रुग्ण होते. आता पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. या आकड्यावरून मुंबईतील कोरोना संसर्गाची भीषणता समोर येते आहे.   मुंबईतली परिस्थिती हाताबाहेर जाते की काय अशी परिस्थिती आहे.

यावर्षी कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि आता धारावीसारख्या (Coronavirus new hotspot in Mumbai) झोपडपट्टी परिसराऐवजी आता उच्चभ्रू परिसरात कोरोनाने शिरकाव केला आहे. धारावीऐवजी आता कोरोनाने अंधेरी भागाकडे कूच केली आहे. जिथं बहुतेक बॉलिवूड स्टार्स राहतात अशाच भागात कोरोनाचे सर्वात जास्त केसेस आहेत.

हे वाचा - धारावी नव्हे हा उच्चभ्रू परिसर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट; मुंबईकरांनो इथं जाणं टाळा

मुंबईत कोरोनाचे डबल म्युटेशन वेरिएंटचे  21 रुग्ण सापडले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना सध्या क्वारंटाईन करण्यात आलं आहे, अशी माहिती बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

राज्यातील कोविड 19 टास्क फोर्सचे डॉक्टर संजय ओक यांनी सांगितलं, 'भारतातला कोरोनाचा चा उपप्रकार (स्ट्रेन) अत्यंत संसर्गजन्य आहे ज्यामुळे करोना बाधितांची संख्या वाढताना बघायला मिळते आहे. सरकारने छोटे छोटे कंटेनमेंट झोन केले पाहिजे. पण अनेक भागांमध्ये वेगवेगळे लसीकरण केंद्र सुरू केले पाहिजेत आणि कंटेनमेंट झोनमधील लोकांनाही लसीकरणाला जाण्याची मुभा देण्यात यावी.'

शहरातील वाढती कोरोना प्रकरणं पाहता बीएमसीने खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर बंदी घातली आहे. तरीदेखील कुणी हे सण साजरे करताना दिसलं तर त्यांच्यावर कारवाईचा इशाराही पालिकेने दिला आहे.

हे वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा 'ताप'; 9 जिल्ह्यांनी वाढवलं मोदी सरकारचं टेन्शन

शिवाय केंद्र सरकारने लॉकडाऊन बाबत नवीन निर्बंध जाहीर केले आहेत. 1 एप्रिल ते 31 एप्रिल पर्यंत हे नियम लागू करण्यात येणार आहेत. गृहमंत्रालयाने नवीन निवेदन जाहीर केलं आहे. यात कोरोनाशी लढण्यासाठी उपाय करण्याचा हक्क स्थानिक प्रशासनाला देण्यात यावा असं म्हटलं आहे. म्हणजे आत्ता स्थानिक, जिल्हा किंवा तालुका पातळीवर लॉकडाऊन होऊ शकतं . आत्ता तर लॉकडाऊन झालं तर कोणत्याही प्रमाणात प्रवासाचे निर्बंध नसतील. या लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारची जिल्हा बंदी नसणार आहे. राज्या-राज्यामधील प्रवासी वाहतूक सुरु राहील.आत्ता कोणत्याही व्यवहारांवर बंदी घालण्यात येणार नाही. मात्र आवश्यक ते निर्बंध असणार आहेत. SOP चं पालन करून व्यवहार चालू ठेवण्यात येतील.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Mumbai