कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कल्याण डोंबिवलीतून आली एक सकारात्मक बातमी

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कल्याण डोंबिवलीतून आली एक सकारात्मक बातमी

चिंता व्यक्त केली जात असताना एक सकारात्मक बातमी समोर आली आहे.

  • Share this:

कल्याण, 5 जुलै :  गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने मोठी वाढ होत आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात असताना एक सकारात्मक बातमी समोर आली आहे.

कल्याण पूर्वेतील दुर्गा माता रोड परिसरात राहणाऱ्या मुकेश झा या इसमाला 21 तारखेला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झालं. त्यांनंतर त्यांच्या तीन मुलांसह त्यांच्या 104 वर्षे वय असलेल्या वडिलांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. 23 तारखेला त्यांचे वडील आनंदी झा याना ठाणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

अखेर 11 दिवसांच्या लढ्यानंतर प्रचंड इच्छा शक्तीच्या जोरावर 104 वर्षाचे आनंदी झा यांनी कोरोनाला हरवलं. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना आज सायंकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते कल्याण येथील घरी परतले. कोरोनाला हरवणाऱ्या या वयोरुद्ध योद्ध्याचं परिसरातील नागरिकांनीही आनंदात स्वागत केलं.

दरम्यान, कल्याण डोंबिवलीत आज कोरोनाचे नवे 482 रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 3 हजार 582 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेने माहिती दिली. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी याआधीच पालिकेकडून पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: July 5, 2020, 11:41 PM IST

ताज्या बातम्या