Home /News /mumbai /

कोरोनाचं थैमान: महाराष्ट्रातल्या मृतांचा आकडा 11वर, पालघरमध्ये एकाचा मृत्यू

कोरोनाचं थैमान: महाराष्ट्रातल्या मृतांचा आकडा 11वर, पालघरमध्ये एकाचा मृत्यू

Sanitary workers disinfect the Warszawa Zachodnia (Warsaw Western) coach station at the end of the day in a new routine intended to fight the spread of the coronavirus, in Warsaw, Poland, Wednesday, March 25, 2020. For most people, the new coronavirus causes mild or moderate symptoms, such as fever and cough that clear up in two to three weeks. For some, especially older adults and people with existing health problems, it can cause more severe illness, including pneumonia and death. (AP Photo/Czarek Sokolowski)

काल सायंकाळपासून आजाराची लक्षणे अधिक प्रमाणामध्ये दिसू लागली. त्याचप्रमाणे आज सकाळपासून त्याची प्रकृती गंभीर झाली होती.

  पालघर 31 मार्च : पालघर तालुक्यातील सफाळे उसरणी येथे वास्तव्य करणाऱ्या एका 50 वर्षीय नागरिकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला गेल्या तीन दिवसांपासून पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात देखरेखीसाठी व उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राज्यातल्या मृतांचा आकडा 11वर गेला आहे. ठाण्यातल्या वागळे इस्टेट येथे काम करणारी ही व्यक्ती गेल्या काही दिवसापासून उसरणी व सफाळे येथे वास्तव्य करत होती. तसेच त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यासाठी सफाळे आरोग्य केंद्र इतर खाजगी वैद्यकीय आस्थापनांमध्ये भेट दिली होती. करोना संसर्गाचे लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. मात्र गेल्या तीन दिवसापासून त्याच्या तपासणीचा अहवाल प्रतीक्षेत असल्याने त्याबद्दलचे निश्चित निदान झाले नव्‍हते. त्याला करोना संसर्ग झाल्याचे आज निश्चित झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. काल सायंकाळपासून आजाराची लक्षणे अधिक प्रमाणामध्ये दिसू लागली. त्याचप्रमाणे आज सकाळपासून त्याची प्रकृती गंभीर झाल्याने पालघर मधील वैद्यकीय आस्थापनातील अधिकार्‍यांची धावपळ सुरू झाली होती. दरम्यान सायंकाळी उशिरा त्याचे निधन झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

  हे वाचा- ‘कोरोना’मुळे दररोजच्या जगण्यातल्या या दोन गोष्टी होऊ शकतात हद्दपार

  या व्यक्तीचा प्रवासादरम्यान तसेच गावातील वास्तव्यादरम्यान अनेकांशी संपर्कात आला असल्याने आगामी काळात अनेकांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मृतांच्या जवळच्या नातेवाईकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रात एका दिवसात 72 कोरोनाव्हायरसचे नवे रुग्ण दाखल झाले आहेत. ही एका दिवसातली आतापर्यंतची सर्वांत मोठी संख्या आहे. देशभरात कुठल्याही एका राज्यात एकदम एवढ्या संख्येने रुग्णांमध्ये वाढ झालेली नाही. आता राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 302 झाला आहे.

   हे वाचा- ‘आता जगायचं कसं? ‘कोरोना’मुळे आमच्या स्वप्नांची पार माती झाली’

  आजचा दिवस राज्यासाठी धक्कादायक ठरला. संपूर्ण राज्य लॉकडाउन असतानाही एकदम 72 ने रुग्णसंख्या वाढली. 230 वरून आकडा थेट 302 झाला आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  पुढील बातम्या