मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मोठी बातमी! केवळ धारावी नाही आता अख्ख्या मुंबईने जिंकला लढा, संपूर्ण मुंबापुरी कंटेनमेंट झोन फ्री!

मोठी बातमी! केवळ धारावी नाही आता अख्ख्या मुंबईने जिंकला लढा, संपूर्ण मुंबापुरी कंटेनमेंट झोन फ्री!

कोरोनाशी लढणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईमध्ये एकही कन्टेनमेंट झोन नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

कोरोनाशी लढणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईमध्ये एकही कन्टेनमेंट झोन नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

कोरोनाशी लढणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईमध्ये एकही कन्टेनमेंट झोन नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

मुंबई, 14 ऑगस्ट: कोरोनाशी लढणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईमध्ये एकही कन्टेनमेंट झोन नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. आतापर्यंत अंधेरीत 2 कन्टेनमेंट (Containment Zone Free Mumbai)  झोन होते, ते देखील रद्द करण्यात आले आहेत. मुंबईतील कोरोनाचा फैलाव रोखण्यात पालिकेला यश मिळालं आहे. असे असले तरीही धोका अद्याप टळलेला नाही. काही भागात अद्यापही इमारती सील आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेणं आवश्यक आहे. मुंबई कंटेनमेंट झोन फ्री झाली असली तरी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी (Mumbai Mayor Kishori Pednekar Coronavirus in Mumbai) काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

कन्टेनमेंट झोन म्हणजे काय?

एखाद्या भागात कोरोनाबधितांची संख्या जास्त असेल तर त्या भागातील प्रवेश आणि निकास यावर बंदी असते. त्या भागांत बाधितांची संख्या कमी करण्यावर भर दिला जातो. महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या  बहुतांश लोकांची RTPCR/अँटिजेन चाचणी केली जाते. दरम्यान मुंबईत आता एकही कंटेनमेंट झोन नसल्याने मोठा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे.

हे वाचा-लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश, अन्यथा...; पाहा नवे नियम

मुंबईत डेल्टा प्लसचा धोका वाढला

मुंबईत आता 7 आणि आधीच्या 4 अशा 11 महिला डेल्टा प्लसने बाधित झाल्या आहेत. त्यामुळे धोका वाढला आहे. या 11 महिलांपैकी 6 जणी कुलाबा वॉर्डातील आहेत, तीन घाटकोपर वॉर्डातील असून एक महिला कुर्ला वॉर्ड तर तर एक भायखळ्यातील आहे. दरम्यान 27 जुलै रोजी मुंबईत 63 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसने मृत्यू झाला होता, डेल्टा प्लसमुळे मुंबईतील हा पहिला तर राज्यातील तिसरा मृत्यू आहे. जिनोम सिक्वेन्सीन्गमुळे हा डेल्टाचा मृत्यू असल्याची माहिती समोर आली आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus, Mumbai