Home /News /mumbai /

Corona: नोकरीवरून काढल्यानं कर्मचाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं कारण

Corona: नोकरीवरून काढल्यानं कर्मचाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं कारण

मुंबई विमानतळावर ट्रॉली सुपरवाझरचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची नोकरी गेली आणि...

    मुंबई, 10 सप्टेंबर : कोरोनाच्या काळात अनेकांची नोकरी गेली तर काहीजणांना नोकरीवरून काढणार असल्याची टांगती टलवार कायम आहे. कोरोनाच्या काळात नोकरीवरून काढल्यानं तरुणानं आपलं आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई विमानतळावर ट्रॉली सुपरवाझरचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. नोकरीवरून काढल्यामुळे नैराश्येतून या तरुणानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. ही घटना मुंबईतील साकीनाका परिसरात घडली आहे. विनायक खंदारे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. हे वाचा-24 तासांत कोरोनानं मोडले सर्व रेकॉर्ड! सर्वात जास्त नवीन आणि मृत रुग्णांची नोंद या कर्मचाऱ्यानं आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. सुसाईड नोटमध्ये त्यानं कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा होणारा त्रास आणि कामावरून काढल्यानं आलेल्या नैराश्येतून हे पाऊल उचलत असल्याचं म्हटलं आहे.अधिकाऱ्यांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून या तरुणानं आयुष्य संपवल्याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.कर्माचाऱ्याच्या पत्नीनं दिलेल्या माहितीनुसार कोरोना काळात नोकरी गरजेची होती. वारंवार विनंती करूनही लॉकडाऊननंतर नोकरीवर अधिकाऱ्यांनी रुजू होऊ दिलं नाही.या अधिकाऱ्यांनी मानसिक त्रास देऊन राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं असल्याचा आरोप मृत कर्मचाऱ्याच्या पत्नीने केला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह आणि सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या