मुंबई, 23 मार्च : गेल्या वर्षी कोरोनामुळे होळी (Holi), रंगपंचमी साजरी करायला न मिळालेले मुंबईकर यंदा होळी आणि रंगपंचमीची उत्सुकतेने वाट पाहत होते. मात्र यंदाही कोरोनामुळे होळी-रंगपंचमीच्या रंग बेरंगर झाला आहे. यावर्षीदेखील होळी आणि रंगपंचमी साजरी करता येणार नाही आहे. मुंबई महापालिकेने (BMC) यंदाही होळी-रंगपंचमी साजरी (Holi celebration in mumbai) करण्यास मनाई केली आहे आणि याच पालन न करण्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई, पुणे, नागपुरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढते आहे. लोक कोरोना नियमांचं पालन करत नाही आहेत. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर नागरिक बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. त्याचा परिणाम म्हणजे कोरोनाची आता दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोनाला आवरण्यासाठी आता पुन्हा कडक निर्बंध लादले जात आहेत. कठोर पावलं उचचली जात आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने एक परिपत्रक जारी केलं आहे.
हे वाचा - पुन्हा कर्फ्यू? Lockdown लागला तर काय असतील निर्बंध? मोदी सरकारचे नवे आदेश
त्यानुसार 28 मार्च, 2021 रोजी होळी आणि 29 मार्च, 2021 रोजी येणारं धुलिवंदन किंवा रंगपंचमी सार्वजनिक किंवा खासगी ठिकाणीही साजरी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तरीदेखील हे उत्सव साजरे करताना आढळल्यास आपत्ती निवारण अधिनियम 2005 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे, असं बीएमसीने सांगितलं आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन मुंबई महापालिका आयुक्तांनी केलं आहे.
हे वाचा - Covid-19 शी लढण्यासाठी मोदी सरकारचा नवा प्लॅन; राज्यांना दिले 3 महत्त्वाचे आदेश
मुंबईत आज दिवसभरात 3512 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत एकूण 3,69,426 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 3,29,234 रुग्ण बरे झाले आहेत तर सध्या 27,672 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.