LIVE: पुण्यातील MG रोडवरील फॅशन स्ट्रिटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे लेटेस्ट अपडेट

 • News18 Lokmat
 • | March 26, 2021, 23:52 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:19 (IST)

  मुंबईत दिवसभरात 5513 नवे रुग्ण, मृत्यू 9
  मुंबईत 3 दिवसांपासून 5 हजारांपेक्षा अधिक रुग्ण
  मुंबईत कंटेन्मेंट झोन 43, इमारती सील 497

  22:5 (IST)

  नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 4099 नवे रुग्ण
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू

  21:41 (IST)

  पुणेकरांनो, सावधान! कोरोनाचा विळखा घट्ट
  पुणे जिल्ह्याची आजची रुग्णवाढ 7 हजार पार
  पुण्यात दिवसभरात 7090 नवीन रुग्ण
  पुणे जिल्ह्यात दिवसभरात 37 रुग्णांचा मृत्यू
  पुण्यात 4 दिवसांपासून रोज साडेतीन हजार रुग्णवाढ
  ग्रामीण पुणे, पिंपरी-चिंचवडचा आकडाही वाढताच

  21:30 (IST)

  भारत विरुद्ध इंग्लंड दुसरी वन-डे
  इंग्लंडचा भारतावर दणदणीत विजय
  भारताचा 6 विकेट्स राखून केला पराभव
  इंग्लंडची वन-डे मालिकेत 1-1 अशी बरोबरी

  21:25 (IST)

  राज्यात दिवसभरात 36 हजार 902 नवे रुग्ण
  राज्यात दिवसभरात 112 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात दिवसभरात 17019 रुग्ण कोरोनामुक्त
  सध्या 2 लाख 82 हजार 451 अॅक्टिव्ह रुग्ण

  20:29 (IST)

  जळगाव जिल्ह्यात 28 ते 30 मार्च संपूर्ण लॉकडाऊन
  दूध, मेडिकल वगळता सर्व आस्थापनं बंद
  जळगावात शाळा-महाविद्यालय, मॉल, दुकानं बंद
  जळगाव जिल्ह्यात फक्त हॉटेल पार्सल सुविधा
  जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आदेश

  20:24 (IST)

  नवी मुंबई पोलिसांमार्फत शहरात ऑलआऊट मोहीम
  600 पोलीस, 100 मनपा कर्मचारी, 200 पोलीस मित्र
  एकाच वेळी संपूर्ण शहरात पोलिसांची कारवाई
  कोरोनाचा नियम न पाळणाऱ्यांवर मोठी कारवाई
  APMC बाजारपेठ, शहरातील सिग्नलवर मोहीम

  19:45 (IST)

  अमरावती - RFO दीपाली आत्महत्या प्रकरण
  DFO विनोद शिवकुमार यांचं निलंबन
  राज्य सरकारची अखेर कारवाई
  क्षेत्र संचालकांची अन्यत्र बदली होणार
  तोपर्यंत नागपूर कार्यालयात हजेरीचे आदेश

  19:40 (IST)

  राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी, रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचना

  19:39 (IST)

  'मुख्यमंत्र्यांचं सरकार वाचवण्याकडे फक्त लक्ष'
  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची टीका
  'जनतेला कोरोनापासून वाचवण्याकडे दुर्लक्ष'
  चंद्रकांत पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका