डोंबिवलीत संशयीत कोरोनाग्रस्तासाठी Ambulance यायला 7 तास उशीर,  पालिका-जि.प.हद्दीचा वाद

डोंबिवलीत संशयीत कोरोनाग्रस्तासाठी Ambulance यायला 7 तास उशीर,  पालिका-जि.प.हद्दीचा वाद

दुपार 3 वाजता फोन करून संबंधित विभागाला कळविण्यात आले होते. रात्री 10 वाजता Ambulance पोहोचली.

  • Share this:

डोंबिवली 31 मार्च : डोंबिवलीमधील आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील येणाऱ्या एका मोठ्या संकुलात एका महिलेला कोरोनाची लक्षणे दिसू लागली. सदर त्या महिला 54 वर्षांच्या असून पुण्यावरुन आल्याची माहिती स्थानिकानीं दिली. दुपारी 3 च्या सुमारास त्यांना लक्षणे दिसू लागताच Ambulance बोलवण्यात आली मात्र महापालिका आणि जिल्हापरिषद हद्दीतील वादात रुग्णवाहिका यायला तब्बल सात तास उशीर झाला. Ambulance पोहोचायला 10 वाजले. रुग्णवाहिका यायला वेळ झाल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री यांना ट्विट सुद्धा केले होते.  मात्र रुग्णवाहिका यायला तब्बल 7 तास लागल्याचे स्थानिकांनी सांगितले. रुग्णवाहिका जर वेळ येत नसेल तर प्रशासनाने काय तयारी केली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीनुसार डोंबिवली पूर्व येथील राजाजी पथ, विजयनगर, बालाजी गार्डन, कोपर स्टेशन झोपडपट्टी व आहिरे गांव, सहकारनगर हे भाग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुर्णतः बंद करण्यात आलेले आहेत. तेथील रहिवाशांनी घरातून बाहेर पडू नये असे सांगण्यात आले आहे.

महानगरपालिकेचे भरारी पथक सुद्धा त्या परिसरात असतील त्यामुळे शक्यतो नागरिकांनी सहकार्य करावे व घराबाहेर जाण्याचे टाळावे. नागरिकांना लागणारे किराणा समान, भाजीपाला व औषधे घरी पोहोचवली जातील त्यामुळे प्रभागातील दिलेल्या दुकानदारांच्या दूरध्वनी क्रमांकाला संपर्क साधून आपल्या सोयी पूर्ण कराव्यात असंही सांगण्यात आलं आहे.

‘तब्लिगी’मध्ये सहभागी झालेल्यांची तपासणी करा, अशी मागणी करणाऱ्याच्या घरावर हल्ला

पालघर तालुक्यातील सफाळे उसरणी येथे वास्तव्य करणाऱ्या एका 50 वर्षीय नागरिकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला गेल्या तीन दिवसांपासून पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात देखरेखीसाठी व उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राज्यातल्या मृतांचा आकडा 11वर गेला आहे.

VIDEO कोरोनामुळे घरात बंद असताना प्रेयसीला भेटण्यासाठी तरूणाची भन्नाट शक्कल

ठाण्यातल्या वागळे इस्टेट येथे काम करणारी ही व्यक्ती गेल्या काही दिवसापासून उसरणी व सफाळे येथे वास्तव्य करत होती. तसेच त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यासाठी सफाळे आरोग्य केंद्र इतर खाजगी वैद्यकीय आस्थापनांमध्ये भेट दिली होती. करोना संसर्गाचे लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते.

मात्र गेल्या तीन दिवसापासून त्याच्या तपासणीचा अहवाल प्रतीक्षेत असल्याने त्याबद्दलचे निश्चित निदान झाले नव्‍हते. त्याला करोना संसर्ग झाल्याचे आज निश्चित झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2020 11:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading