दिवाकर पांडे, मुंबई 21 एप्रिल: कोरोनाविरुद्धच्या लढाईल डॉक्टर्स आणि पोलीस सगळ्यात आघाडीवर लढत आहेत. डॉक्टर्स हॉस्पिटलमध्ये जीव वाचवत आहेत. तर पोलीस बाहेर सगळ्यांची सुरक्षा करत आहेत. मात्र लॉकडाऊनचं पालन न करता बाहेर हिंडणाऱ्यांचा पोलिसांना बंदोबस्त करावा लागतोय. त्यामुळे त्यांच्यावरचा ताण वाढला आहे. सतत फिल्डवर राहणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाची लागण होत आहे. गेल्या 12 तासांमध्ये आणखी 9 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे एकूण पोलिसांची संख्या 49वर गेली आहे. यात 11 अधिकारी आणि 38 जवानांचा समावेश आहे.
या आधी काही डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मुंबईतल्या 53 पत्रकारांनाही कोरोनाने ग्रासलं असल्याचं उघड झालं होतं.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर तैनात APIला कोरोना सदृष्य लक्षणं दिसून आली आहेत. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. मात्र त्याला घरीच आयसोलेशनमध्ये राहायला सांगण्यात आलं आहे. तर इतर सर्व कर्मचाऱ्यांचीही तपासणी होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरच राहाणं पसंत केलं. वर्षा बंगल्यावर ते फक्त शासकीय बैठका आणि भेटीगाठीच घेत होते. कोरोनाच्या प्रकोपानंतर त्यांनी फक्त मोजक्याच बैठका या वर्षावर घेतल्या होत्या.
डॉक्टर दाम्पत्याला सलाम, काळजाच्या तुकड्याला कुलुपबंद करून जावं लागतं रुग्णालयात
राजभवन, सह्याद्री गेस्ट हाऊस, मंत्रालय आणि इतर महत्त्वाच्या सर्व कार्यालयांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांनाही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सॅनिटाजेशनचं काम सुरू आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहे. केंद्र सरकारने काही निकष लावून राज्याला रॅपिड टेस्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात 75 हजार चाचण्या केल्या जातील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
कोरोनाच्या Lockdown मध्ये पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी असे एकत्र आले हजारो हात
मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर राज्याच्या कोरोना उपचार रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यावर भर देण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह आणि झूम अॅपच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती त्यांनी दिली.
प्रेरणादायी! लॉकडाऊनमध्ये कामाचा सदुपयोग, 'हा' वल्ली तयार करतोय कोरोना लायब्ररी
ते पुढे म्हणाले, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कारण राज्यात सर्वाधिक चाचण्या केल्या आहेत. त्यासाठी आयसीएमआरच्या सूचना कटाक्षाने पाळल्या जात आहे. त्याचबरोबर घरोघर जाऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण देखील केले जात आहे. त्यासाठी 6359 पथके कार्यरत आहेत. कुठलीही तडजोड न करता सर्वेक्षण केले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.