Home /News /mumbai /

मुंबईला कोरोनाचा धोका कायम, राज्यात रुग्णसंख्येने ओलांडला 4,666चा टप्पा

मुंबईला कोरोनाचा धोका कायम, राज्यात रुग्णसंख्येने ओलांडला 4,666चा टप्पा

जगात 1 कोटी 65 लाख लोक कोरोनाबाधित आहेत. त्यात 57 लाखांपेक्षा जास्त लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत.

जगात 1 कोटी 65 लाख लोक कोरोनाबाधित आहेत. त्यात 57 लाखांपेक्षा जास्त लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत.

राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या 76 हजार 92 एवढी झाली आहे. त्यापैकी 76 हजार 611 चाचण्या या निगेटिव्ह आल्या आहेत.

मुंबई 20 एप्रिल: राज्यातल्या कोरना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 12 तासांमध्ये आज 466 नवीन रुग्ण सापडले. तर 9 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरनाबाधितांची संख्या 4,666 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 232वर गेला आहे. आज 65 रुग्ण बरे झालेत. तर त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 572 झाली आहे. तर राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या 76 हजार 92 एवढी झाली आहे. त्यापैकी 76 हजार 611 चाचण्या या निगेटिव्ह आल्या आहेत. सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या 81 टक्के रुग्णांना कुठलीही लक्षणं आढळलेली नाहीत. म्हणजेच लक्षणं दिसत नसली तरी कोरना असू शकतो हे आता स्पष्ट झालं आहे. धारावीत 30 नवे रुग्ण आढळले त्यामुळे धारावीतल्या एकूण रुग्णांची संख्या 168वर गेली आहे. सगळ्यात जास्त रुग्ण 5 हे शास्त्रीनगर मध्ये तर आठ रुग्णांचा पत्ता शोधून काढण्याचे काम सुरू आहे. आज एकही नव्या मृत्यूची नोंद नाही. धारावीत आत्तापर्यंत 11मृत्यू झाले आहेत. Coronavirus विरोधात लढा : भारताने अशी आखली रणनीती, विकसित देशही झाले फेल दरम्यान, पुण्यात ससूनमध्ये गेल्या 48 तासात एकही मृत्यूची नोंद नाही. पुण्यातील वाढता कोरोना मृत्यूदर आटोक्यात आणण्यात ससून प्रशासनाला अखेर यश आले. ससूनमध्ये गेल्या महिन्याभरात 41 रूग्ण दगावलेत, पण गेल्या 48 तासात एकही मृत्यू नाही. मृत्यूदर वाढल्याने आणि इतर तक्रारीवरून ससूनचे डीन डॉ. अजय चंदनवाले यांची उचलबांगडी करण्यात आली होती. ससूनचा चार्ज आता उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे देण्यात आला आहे. पुणे शहरात कोरोनाबाधित रूग्णाची संख्या 612 वर पोहोचली आहे. सोमवारी (20 एप्रिल) दिवसभरात पुण्यात 23 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. एकट्या वेल्हा तालुक्यात 7 नवे रूग्ण आढळले आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 57 झाली. या पार्श्वभूमीवर पुण्यात 100 टक्के कर्फ्यू लागू करण्यात आली आहे. 27 एप्रिलपर्यंत हा नवा आदेश लागू असणार आहे, अशी माहिती पुणे शहराचे सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.

‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत भारताच्या या कंपनीचा पुढाकार, अमेरिकेने मानले आभार

कोरोना व्हायरला प्रसार वेगाने होत असल्याने सरकारने पुण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मध्यरात्री 12 पासून पुणे महापालिका हद्दीच्या सर्व सीमा सील करण्यात येत आहेत. त्यामुळे कुणीही सीमा हद्दीच्या बाहेर किंवा आत येऊ शकणार नाही. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने हा कठोर निर्णय घ्यावा लागला असं प्रशासनाने म्हटलं आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:

पुढील बातम्या