Home /News /mumbai /

धारावीत कोरोनाचा तिसरा रुग्ण सापडला, 35 वर्षंचा डॉक्टर बाधीत

धारावीत कोरोनाचा तिसरा रुग्ण सापडला, 35 वर्षंचा डॉक्टर बाधीत

Mumbai: A boy looks on from the window of his house during a nationwide lockdown in the wake of coronavirus pandemic, at Dharavi in Mumbai, Thursday, April 2, 2020. The death of a COVID-19 patient from Mumbai's Dharavi, known as one of the biggest slums in Asia, has exposed its residents to the vulnerability of contracting the viral infection and sparked a fear of its spread in the highly congested area. (PTI Photo/Kunal Patil)(PTI02-04-2020_000137B)

Mumbai: A boy looks on from the window of his house during a nationwide lockdown in the wake of coronavirus pandemic, at Dharavi in Mumbai, Thursday, April 2, 2020. The death of a COVID-19 patient from Mumbai's Dharavi, known as one of the biggest slums in Asia, has exposed its residents to the vulnerability of contracting the viral infection and sparked a fear of its spread in the highly congested area. (PTI Photo/Kunal Patil)(PTI02-04-2020_000137B)

मुंबई 02 एप्रिल :मुंबईतल्या धारावीत कोरोनाचा तिसरा रुग्ण सापडला आहे. या आधीही 56 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. नंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. या रुग्णाला सायन (Sion Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  त्यानंतर सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यालाही कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होतं.  आता हा तिसरा रुग्ण सापडला आहे. हा 35 वर्षे वयाचा रुग्ण डॉक्टर आहे. तो जनरल प्रॅक्टिशनर आहे. त्याला  रहेजा मध्ये भर्ती केलं जाणार आहे. मुंबई सेंट्रल च्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्येही ते काम करतात. त्यांच्या संपर्कात आलेले रुग्ण, जे त्यांनी तपासले होते त्यांचा शोध सुरू आहे. या डॉक्टरांनी कुठे प्रावास केला होता का याची माहिती घेणं सुरू आहे. कालच्या धारावी मध्ये सापडलेल्या आणि मृत झालेल्या व्यक्तीशी संबंध आला नव्हता असंही सांगितलं जात आहे. धारावीनंतर  वरळी कोळीवाडा आणि सायन कोळीवाड्यातील पंजाबी कॅम्प येथे एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा रुग्ण राहत असलेली इमारत पालिका आणि पोलिसांनी सिल केली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत या इमारतीमधील रहिवाशांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात चाळी आणि झोपड्या आहेत. त्यात दाटीवाटीने लोक राहतात. अशा ठिकाणी कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यास त्या परिसरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच वरळी कोळीवाडा, घाटकोपर, धारावी सारख्या विभागातील दाटीवाटीने राहणाऱ्या लोकांच्या वस्तीत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईमध्ये कोरोनाचा हाहाकार, 8 तासांत आढळले 62 नवे रुग्ण, 3 जणांचा मृत्यू मुंबईच्या सायन कोळीवाडा विभागात पंजाबी कॅम्प आहे. हा विभाग भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाला त्यावेळी बॉर्डरवर असलेल्या लोकांचा म्हणून ओळखला जातो, या विभागात अनेक चाळी आहेत. या चाळीमधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्याची माहिती मिळताच पालिकेच्या आरोग्य विभाग आणि पोलीस इमारत सिल केली आहे. इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना अन्न, धान्य तसेच लागणारे इतर साहित्य घरपोच दिले जाणार आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत आणि इतर रुग्णांच्या चाचण्यांचा रिपोर्ट येत नाही तो पर्यंत नागरिकांनी इमारतीबाहेर पडू नये असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. धारावीत दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण, सॅनिटाइझ करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण कोरोना संदर्भात मुंबईकरांची चिंता वाढवणारे आकडे समोर आले आहेत. मुंबईमध्ये अवघ्या 8 तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 63वर गेली आहे तर आज दिवसभरात  महाराष्ट्रात 81 नवे रुग्ण सापडले आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या आता 416वर पोहोचली आहे. तर मुंबईमध्ये कोरोनामुळे 24 तासांत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या या वाढत्या आकड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून नियमांचं पालन करा आणि घरात सुरक्षित राहा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:

Tags: Dharavi

पुढील बातम्या