Home /News /mumbai /

मुंबईत SRPF चे 3 जवान तर गुजरातमध्ये सैन्याच्या 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबईत SRPF चे 3 जवान तर गुजरातमध्ये सैन्याच्या 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

गुजरातमधील बडोदा इथे सैन्याच्या तीन कर्मचार्‍यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

    मुंबई, 24 एप्रिल : महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आता कोरोना आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांनंतर जवानांपर्यंत पोहोचला आहे. मुंबईत ड्युटीवर तैनात असलेल्या SRPF च्या जवानांना कोरोनाची लागण झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी हे जवान मुंबईहून पुण्यातील CRPF हेडक्वॉटरमध्ये हे जवान आले होते. या तीन जवानांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आता उर्वरित 96 जवानांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्या सर्व जवानांच्या चाचण्या घेण्यात येणार असून त्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. गुजरातमधील बडोदा इथे सैन्याच्या तीन कर्मचार्‍यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तिघांनी त्याच दिवशी एटीएममधून पैसे काढले होते. या ATMमधून कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तीन कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या 28 जणांना आता क्वारंटाइन करण्यात आलं आहे. हे वाचा-'बारामती पॅटर्न': केंद्रीय समितीकडून कोरोना वॉरीयर्स, सोल्जर, फायटरचं कौतुक मुंबईत कोरोनाग्रस्तांचा 4 हजार तर महाराष्ट्रातील आकडा 6 हजारपेक्षा अधिक आहे. मागच्या 24 तासांत 522 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 21700 पर्यंत पोहोचला आहे. तर देशात 1229 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 32 राज्यांपैकी 3 राज्य पूर्णपणे कोरोनामुक्त होण्यात यशस्वी ठरली आहेत. हे वाचा-VIDEO : सुट्टी न मिळाल्यानं पोलिसानं सहकाऱ्यांना ठेवलं ओलिस, 3 तास केला गोळीबार
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Gujrat, Pune news

    पुढील बातम्या