दिलासादायक बातमीनंतर पुन्हा चिंता वाढवणारी आकडेवारी, राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ

दिलासादायक बातमीनंतर पुन्हा चिंता वाढवणारी आकडेवारी, राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ

राज्यात 2940 नवीन रूग्ण आढळले आहेत, तर 99 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 30 मे : राज्यात शुक्रवारी बऱ्या झालेल्या रुग्णांची विक्रमी आकडेवारी समोर आल्यानंतर दिलासा व्यक्त करण्यात येत होता. मात्र त्यानंतर आज पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज राज्यात 2940 नवीन रूग्ण आढळले आहेत, तर 99 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आजही 1084 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राजधानी मुंबईची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. मुंबईत 1510 नवे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 65 हजार 168 इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2197 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधितांमध्ये एकट्या मुंबईतील 38442 रुग्णांचा समावेश आहे.

शुक्रवारी राज्यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा उच्चांक

कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी उच्चांक गाठला. एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. त्यातील सर्वाधिक 7358 रुग्ण एकट्या मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

First published: May 30, 2020, 8:43 PM IST

ताज्या बातम्या