ठाणे 13 एप्रिल : ठाणे शहरात सोमवारी दिवसभरात तब्बल 28 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. केवळ एका दिवसांत 28 रुग्ण सापडले असून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अंगरक्षक, स्वयंपाकी तसेच इतर कार्यकर्ते अशा 14 जणांचा यामध्ये समावेश असून उर्वरित इतर 14 रुग्ण हे शहरातील विविध भागात सापडले आहेत. हे रुग्ण दाटीवाटीच्या परिसरातील असल्याने आता प्रशासनासमोर कोरोनाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे रविवारपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची 46वर असलेली संख्या ही सोमवारी 76वर जाऊन पोचली आहे.
ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ठाण्यात मागील 24 तासात तब्बल 28 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे ठाणे शहरावर कोरोनाचे संकट अधिकच गडद होत आहे. आतापर्यंत ठाणे शहरात दररोज 5 ते 6 रुग्णांची भर पडत होती. मात्र सोमवारी दिवसभरात हा आकडा 28 वर गेल्याने आता ठाणे महापालिकेने अधिक कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
पालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अधिक दक्षता घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या स्टाफमधील 14 जणांच्या व्यतिरिक्त ठाणे शहराच्या विविध भागात 14 नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये ढोकाळी, आझाद नगर, चरई, कासारवडवली, वाघबीळ, कौसा, विटावा, खारेगांव, शांती नगर, रगूनाथ नगर, महाराष्ट्र नगर, गांधी नगर, गार्डन इस्टेट या परिसरात प्रत्येक 1 रुग्ण सापडला असून वागळे इस्टेट परिसरात 2 रुग्ण सापडले आहेत.
कोरोना वॉरिअर्सची ताकद वाढणार, मुंबईतील नामवंत डॉक्टरांचा कोरोनाच्या लढाईत सहभाग
ठाणे शहरात सापडलेल्या रुग्णांमध्ये 5 पोलिसांच्या समावेश असून 2 पत्रकारांचा देखील समावेश आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची देखील तपासणी करण्यात येत आहे . घोडबंदर पट्ट्यात सापडलेल्या एका रुग्णाने डी मार्टमध्ये हजेरी लावल्याने डी मार्ट व्यवस्थापनाने देखील डी मार्ट बंद केले आहे. तर सोमवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये एका खाजगी हॉस्पिटलमधील नर्स आणि वार्ड बॉयचा समावेश असून हे हॉस्पिटल देखील बंद ठेवण्यात आले आहे अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
हे वाचा -