मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट धडकली? सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक आकडेवारी समोर

BREAKING : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट धडकली? सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक आकडेवारी समोर

आज एकाच दिवसामध्ये कोरोनाचे नवे रुग्ण 2510 आढळून आले आहे.

आज एकाच दिवसामध्ये कोरोनाचे नवे रुग्ण 2510 आढळून आले आहे.

आज एकाच दिवसामध्ये कोरोनाचे नवे रुग्ण 2510 आढळून आले आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 29 डिसेंबर : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या (corona) रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्याची राजधानी असलेली मुंबई (Mumbai corona cases) पुन्हा एकदा कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत आहे. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मुंबईमध्ये 2 हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. तर एका रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

मुंबई महापालिकेकडून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती देण्यात आली आहे. आज एकाच दिवसामध्ये  कोरोनाचे नवे रुग्ण 2510 आढळून आले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या २ हजार पार आल्यामुळे चिंतेत भर घातली आहे. मंगळवारी सुद्धा मुंबईमध्ये एकाच दिवशी कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली.

(Khajuraho मंदिरांवर कोरलेल्या कामक्रीडा मूर्तींमागचं रहस्य माहितीय का?)

एकाच दिवसात 2172 रुग्ण आढळले होते. 2172 पैकी 1377 रुग्ण एकट्या मुंबईत होते.  गेल्या तीन ते चार दिवसांतील आकडेवारीवरून महाराष्ट्रात सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी मुंबईतील प्रमाण सतत 55 टक्क्यांच्या वर नोंदवलं गेलं आहे. तर ताज्या आकडेवारीनुसार ते 77 टक्क्यांवर पोहोचलं आहे. मुंबईसाठी ही चिंताजनक बाब असून नागरिकांची काळजी यामुळे वाढली आहे.

मुंबई महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 251 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तर  मुंबईमध्ये 1 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या 60 वर्षांच्या वृद्ध रुग्णावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

First published: