रामराज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही, राऊतांचा मोदींना टोला

रामराज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही, राऊतांचा मोदींना टोला

बिहारच्या निवडणुकीतील राजकीय पीछेहाट, पराभवसुद्धा ‘सण’ म्हणून साजरे केले जात आहेत. मग मुंबई, महाराष्ट्रातील लोकांनी सण, परंपरांचे पालन का करू नये?

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : 'अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन झालेच आहे. बिहारच्या निवडणुकीत (Bihar Election 2020) पंतप्रधान मोदी  यांनी प्रथमच ‘जय श्रीराम’चे नारे दिले, पण रामाचे राज्य येऊनही कोरोनाचा (Corona) रावण मारला जात नाही' असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांना टोला लगावला.

अन्वय नाईक प्रकरणावरून रिपब्लिक टीव्ही भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. मुंबई हायकोर्टाने जामीन नाकारल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन अर्णब गोस्वामी यांनी जामीन मिळवला. अर्णब गोस्वामींच्या सुटकेवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या (saamana) रोखठोक सदरातून भाष्य केले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीला धक्का; 'लागिरं झालं जी' मालिकेतील अभिनेत्रीचं निधन

'मला हेसुद्धा फारसे पटत नाही. ज्ञान, बुद्धी, विचार कमवावे लागतात. हे कमवणे आता कमी झाले आहे. एका वृत्तवाहिनीचा प्रमुख गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्याबद्दल तुरुंगात गेला. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे तो सुटून तुरुंगातून बाहेर पडला तेव्हा ‘भारतमाता की जय’ वगैरे घोषणा देऊ लागला. येथे भारतमातेचा काय संबंध? ज्या न्यायमूर्ती महाशयांनी व्यक्तिस्वातंत्र्याच्या सबबीखाली त्याची सुटका केली, त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा देणे हे समजण्यासारखे आहे. येथे भारतमाता, राष्ट्रभक्ती वगैरेचा संबंध काय? असा सवालच राऊतांनी विचारला आहे.

'ज्या तरुण उद्योजकाने छळास कंटाळून आत्महत्या केली, त्या अन्वय नाईक यांचीही भारतमाता होतीच व अन्वय नाईकच्या पत्नीचीही भारतमाता आहे. भारतमातेचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा उत्सव फक्त एका व्यक्तीपुरता नसतो. म्हणून रामाच्या विजयाच्या उत्सवाने दिवाळीचे स्वरूप प्राप्त केले. कोरोनाची पर्वा न करता, आर्थिक मंदी, तंगीची फिकीर न करता लोकांनी रस्त्यावर गर्दी केली आहे. भारतमाता त्या सगळ्यांचीच आहे' असंही राऊत म्हणाले.

1 जानेवारी 2021 पासून टोल प्लाजावर FASTag अनिवार्य; जाणून घ्या कसा मिळवाल फास्ट

'प्रभू राम हे विजय प्राप्त करून अयोध्येत आले तेव्हा लोकांनी आनंदाचा उत्सव साजरा केला. तो उत्सव म्हणजे दिवाळी. आता अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन झालेच आहे. बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच ‘जय श्रीराम’चे नारे दिले, पण रामाचे राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही', असं म्हणत राऊत यांनी मोदींना टोला लगावला.

बिहारच्या निवडणुकीतील राजकीय पीछेहाट, पराभवसुद्धा ‘सण’ म्हणून साजरे केले जात आहेत. मग मुंबई, महाराष्ट्रातील लोकांनी सण, परंपरांचे पालन का करू नये? असंही राऊत म्हणाले.

Published by: sachin Salve
First published: November 15, 2020, 9:57 AM IST
Tags:

ताज्या बातम्या