मुंबई, 24 मे : देशातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही राज्यातील कोरोनाबाधितांची (Covid -19) संख्या झपट्याने वाढत आहे. मुंबईतील (Mumbai) कोरोनाबाधितांची संख्या 30000 पार गेली आहे. आज मुंबईत 1725 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबईत आज 1725 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनाच्या एकूण रुग्णाची संख्या 30359 वर पोहचली आहे. आज कोरोनामुळे 39 लोकांचा मृत्यू झाला असून आजवर मुंबईत एकूण 988 जणाचा मृत्यू झाला आहे. आज 598 जण कोरोनमुक्त झाले असून आजवर 8074पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात आजही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलेल्या भाषणात संख्या वाढणार असल्याचे संकेत दिले होते. संख्या वाढणार असली तरी काळजीचं कारण नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. राज्यात आज 3041 रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 50 231 एवढी झालीय. तर आज 58 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत 1635 जणांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे राज्यात आत्तापर्यंत 14 हजार 600 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.
पुणे विभागातली स्थिती
पुणे विभागातील 3 हजार 321 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 हजार 823 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 178 आहे. विभागात कोरोना बाधीत एकुण 324 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 210 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
हे वाचा - घरी परतलेल्या प्रवासी मजुरांसांठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा
तब्बल 3 महिने क्वारंटाइन राहिल्यानंतर चीनहून आलेल्या 'त्या' मांजरीची अखेर सुटका
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.