मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

पावसाळ्यात कोरोनाची चिंताजनक बातमी, मुख्यमंत्र्यांनी केलं डॉक्टरांना आवाहन

पावसाळ्यात कोरोनाची चिंताजनक बातमी, मुख्यमंत्र्यांनी केलं डॉक्टरांना आवाहन

 वाशिम येथे स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुलाच्या इमारतीचा ऑनलाइन ई-भूमीपूजन सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला

वाशिम येथे स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुलाच्या इमारतीचा ऑनलाइन ई-भूमीपूजन सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला

'कोविडची लक्षणे फसवी आहेत. बहुतांश जणांना लक्षणेही दिसत नाही अशा वेळी तुमच्यावर योग्य रीतीने अशा रुग्णास ओळखण्याची जबाबदारी आहे'

  • Published by:  sachin Salve

मुंबई 29, मे : पावसाळ्यात काही रोग व साथी उद्भवतात, त्यांची काही लक्षणे आणि कोविडची लक्षणे (corona symptoms) एकसारखी असतात त्यामुळे डॉक्टर्सनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमधील कोविडची लक्षणे वेळीच ओळखावीत तसंच गृह विलगीकरणातील रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत आहेत किंवा नाही ते बारकाईने पाहावे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) ने आयोजित केलेल्या कोरोना संदर्भातील दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन करतांना बोलत होते. कोविडच्या लढाईत आता डॉक्टर्स देखील मोठ्या प्रमाणावर मैदानात उतरले आहेत त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख सुद्धा हजर होते.

कोणी दुसरा व्यक्ती तुमच्या Aadhaar Card चा वापर तर करत नाही ना? असं ओळखा

'गेल्या वर्षी खासगी डॉक्टर्समध्ये देखील कोविड संसर्गाची मोठ्या प्रमाणवर भीती होती, त्यांनी आपले दवाखाने, रुग्णालये बंद ठेवली होती. कारण आपल्याकडे मास्क, पीपीई कीट तसेच इतर आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा देखील मोठ्या प्रमाणवर तुटवडा होता. परंतु, आता या दुसऱ्या लाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर डॉक्टर्स, जनरल फिजिशियन, विविध रोग तज्ञ, मैदानात उतरले आहेत' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

'आपण “माझा डॉक्टर” या संकल्पनेतून सातत्याने राज्यभरातील डॉक्टर्सशी संवाद साधत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वसामान्य रुग्ण पहिल्यांदा त्याला कोणताही त्रास झाला की आपल्या फॅमिली डॉक्टराकडे तपासणीसाठी जातो, हे लक्षात घेऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. कोविडची लक्षणे फसवी आहेत. बहुतांश जणांना लक्षणेही दिसत नाही अशा वेळी तुमच्यावर योग्य रीतीने अशा रुग्णास ओळखण्याची जबाबदारी आहे. विशेषत: प्राथमिक आणि मध्यम अवस्थेतील आणि ज्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही असा रुग्ण घरीच व्यवस्थित उपचार घेत आहे किंवा नाही ते आपण पहिले पाहिजे. त्याला कधी रुग्णालयात हलविणे आवश्यक आहे त्याकडेही डॉक्टर्सनी काळजीपूर्वक पाहिले पाहिजे' असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात, फडणवीस म्हणाले, आता तरी नाकर्तेपणा सोडा!

'पूर्वीचा संसर्ग आणि सध्याचा संसर्ग यात फरक आहे. आताचा संसर्ग हा म्युटेशन झालेल्या विषाणूमुळे पसरत असून त्याचा वेग खूप जास्त आहे. शिवाय रुग्णांवरही जास्त कला उपचार करावे लागत आहेत, रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये याचीही काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे' असंही मुख्यमंत्री म्हणाले.

'दुसऱ्या लाटेत तरुण वर्गात मोठ्या प्रमाणात संसर्ग दिसतोय तर तिसऱ्या लाटेत बालके संसर्गग्रस्त होऊ शकतात' असे सांगून मुख्यमंत्र्यांनी यादृष्टीने अधिक सावधानता  बाळगली पाहिजे असेही सांगितले.

First published:

Tags: Lockdown, Mumbai