मुंबईत कोरोनाचा धोका वाढला, धारावीत 5 तर दादरमध्ये आढळले 2 रुग्ण

मुंबईत कोरोनाचा धोका वाढला, धारावीत 5 तर दादरमध्ये आढळले 2 रुग्ण

धारावीतील मुकुंदनगरमध्ये आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण सापडले असून आकडा हा 14 वर पोहोचला आहे

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आशिया खंडात सर्वात मोठी झोपडपट्टी ठरलेल्या धारावीमध्ये आज आणखी 5 नवे रुग्ण सापडले आहे. तर दादर परिसरातही 2 रुग्ण आढळले आहे.

कोरोनाचं व्हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.  आज सकाळी धारावीत नवे पाच रुग्ण सापडले आहे.   हे पाचही जण मुकुंदनगरमध्ये सापडले आहे.

हेही वाचा - तापाच्या लक्षणांवर आता घरचे उपचार नकोत; पुण्याच्या अधिकाऱ्यांची कळकळीची विनंती

धारावीतील मुकुंदनगरमध्ये आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण सापडले असून आकडा हा 14 वर पोहोचला आहे तर संपूर्ण धारावीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा 60 वर पोहोचला आहे. आतापर्यंत  7 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर दुसरीकडे दादर परिसरातही आज 2 नवे रुग्ण आढळले आहे.  शिवाजी पार्क परिसरात हे दोन्ही रुग्ण आढळले आहे. यात एका 75 वर्षीय महिला तर 69 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.  दादरमध्ये आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही  21 वर पोहोचली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 2684 वर

हेही वाचा - 'या' कारणामुळे मुंबईत जीवघेणा ठरतोय कोरोना, तज्ज्ञांनी वर्तवली शक्यता

दरम्यान, राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार 14 एप्रिलपर्यंत 2684 कोरोनाग्रस्त राज्यभरात दाखल झाले आहेत. त्यापैकी 178 जणांना बळी गेला आहे. एकट्या मुंबईत 1756 कोरोनारुग्ण आहेत आणि शहरात 112 मृत्यू झाले आहेत. हा मृत्यूदरसुद्धा 6 टक्क्यांच्या वर म्हणजे देशाच्या तुलनेत खूप जास्त आहे. संपूर्ण देशाचा विचार केला, तर मृत्यूदर तीन टक्क्यांहून थोडा जास्त आहे. भारतात आतापर्यंत 353 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आणि देशात 10,815कोरोनाग्रस्त नोंदले गेले आहेत.

 

संपादन - सचिन साळवे

First published: April 15, 2020, 10:01 AM IST

ताज्या बातम्या