पुढच्या 2 आठवड्यात मुंबईच्या या भागात कोरोना आटोक्यात येईल, महापौरांची माहिती

New Delhi: Medics wearing protective suits are seen in the premises of LNJP Hospital during the nationwide lockdown in the wake of coronavirus pandemic, in New Delhi, Saturday, April 18, 2020. (PTI Photo/Kamal Kishore)(PTI18-04-2020_000038B)

मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून रुग्णांची संख्या थांबण्याचं काही नाव घेत नाहीये.

  • Share this:
मुंबई, 20 जुलै : बीकेसीमधील कोविड सेंटरच्या आर्थिक व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा सणसणीत आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केली होता. त्यावर आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधक कितीही टीका करत असले तरी  आयसीएमआरने हे जाहीर केल्यानंतर माझ्यासाठी हा थर्ड अंपायरचा हा निर्णय असल्यासारखं झालं असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. माझे दोन्ही वॉर्ड ऑफिसर किरण दिघावकर आणि शरद उघडे हे 100 दिवस घरी गेले नाहीत. सगळेजण जीव ओतून काम करत आहेत. सगळ्यांची ही एकत्रित मेहनत आहे असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. भाजपचे आमदार अमित साटम यांनी लोकायुक्तांकडे एमएमआरडीएतर्फे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे निविदा न मागवता कोविड सेंटर उभारण्याचं काम दिल्याबद्दल तक्रार केली होती. एमएमआरडीएने कोणतीही निविदा न मागवता बीकेसी 40 कोटींपेक्षा जास्त काम दिलं आहे. त्यात 22 कोटी रुपये खर्च हा केवळ तात्पुरते शेड उभारण्यासाठी करण्यात आला आहे. तसंच हे सेंटर 50 टक्केपेक्षा जास्त रिक्त जागा असून एवढे मोठे सेंटर करण्याच्या निर्णयावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं देखील आमदार साटम यांनी म्हटलं होतं. उत्तर मुंबई पुढच्या 2 आठवड्यात आटोक्यात येईल दरम्यान, राज्यात कोरोनाचा हाहाकार वाढतच चालला आहे. मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून रुग्णांची संख्या थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. पण अशात आता मध्य मुंबईनंतर उत्तर मुंबईतदेखील पुढच्या दोन आठवड्यात कोरोना आटोक्यात येईल अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. राज्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ झालीय. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 9518 रुग्ण आढळून आले आहेत. तर 258 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 3,10,455 एवढी झालीय. तर मृत्यूचा आकडा 12 हजारांच्या जवळ गेला आहे. आज 3906 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात 1,28,730 Active रुग्ण आहेत. तर राज्यातल्या एकूण मृत्यूची संख्या ही 11 हजार 854 वर गेली आहे. काल मुंबईत 1038 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे मुंबईतल्याच एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 388 एवढी झाली आहे. काल मुंबईत 64 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची मृत्यूसंख्या ही 5714 वर गेली आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published: