सेवानिवृत्तीला अवघे 3 दिवस शिल्लक.. कोरोना योद्धानं गमावला जीव तर एक कामावर परतला 

सेवानिवृत्तीला अवघे 3 दिवस उरले असताना अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

सेवानिवृत्तीला अवघे 3 दिवस उरले असताना अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

  • Share this:
मुंबई, 29 मे: सेवानिवृत्तीला अवघे 3 दिवस उरले असताना अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गोरेगाव अग्निशमन दलात कार्यरत असणारे रफिक शेख यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते अशात त्यांचा मृत्यू झाला. येत्या 31 मेरोजी त्यांचा अग्निशमन सेवेतील शेवटचा दिवस होता. 31 मे रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. ला अगदी मोठ्या आनंदाने त्यांनी त्यांच्या मुंबई अग्निशमन दलातील प्रदीर्घ सेवेबद्दल त्यांचं कौतुक करत किंवा त्यांचं निवृत्तीचा सोहळा अगदी छान पार पडला असता. पण ते सगळं याची देही याची डोळा पाहण्याआधीच रफिक शेख यांनी कृत्याने मृत्यूला कवटाळले. हेही वाचा...धक्कादायक! पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमातच 'सोशल डिस्टन्सिंग'ची ऐसी तैसी रफिक शेख हे गोरेगाव अग्निशमन दलामध्ये ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं उघडकीस आलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. रफीकची ही एक कहाणी की, निवृत्तीला 3 दिवस असताना प्राणज्योत मालवली, तर दुसऱ्या बाजूला कोरोनाशी लढा देऊन बरे झालेल्या बेस्टच्या एका कर्मचाऱ्याने निवृत्तीला 3 दिवस शिल्लक असतानाही कामावर परतण्याचा निर्णय घेतला. कोरोनाबाधित असलेल्या आणि मृत्यूशी झुंज देणाऱ्या बेस्टच्या एका कर्मचाऱ्याने निवृत्तीला अवघे तीन दिवस असतानाही शुक्रवारी पुन्हा कामावर येण्याचा निर्णय घेतला. मरोळ डेपोमध्ये काम करणारे रामचंद्र शिंदे यांना 8 मे रोजी साधा खोकला सुरू झाला होता. पण नंतर काही त्यांच्या चाचण्या झाल्या आणि त्याच्या लक्षात आलं की त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना रुग्णालयात भरती केले गेलं उपचार सुरू होते आणि 22 मेला त्यांना बरं होऊन रामचंद्र शिंदे घरी परतले. रामचंद्र शिंदे हे देखील रफिक शेख यांच्याप्रमाणे 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीला पण तीन दिवस आहेत. त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना घरीच आराम करा सांगितलं. पण शिंदे बेस्टमध्ये इन्स्पेक्टर म्हणून काम करतात. शिंदे शुक्रवारी पुन्हा मरोळ डेपोत रुजू झाले. जिथे अनेक ड्रायव्हर कंडक्टर आणि इन्स्पेक्टर यांनी कोरोनाच्या भीतीपायी कामावर येण बंद केलं आहे. बेस्टने अनेकांना कामावर रुजू होण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. ज्यात अनेक तरुण कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पण रामचंद्र शिंदे हे एक सगळ्यांना मोठे उदाहरण आहेत की, स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असताना आणि निवृत्तीसाठी अवघे तीन दिवस शिल्लक असतानाही त्यांनी पुन्हा कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला. रामचंद्र शिंदे हे मूळचे साताऱ्याचे आहेत. त्यांच्या दोन मुली मुंबईत खासगी कंपनीत नोकरी करतात. निवृत्तीनंतर रामचंद्र शिंदेही खासगी कंपनीत रुजू होणार आहेत. शिंदेच्या म्हणण्यानुसार 'मी बेस्टमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. तेव्हापासूनच बेस्ट बंद होईल, असं म्हटलं गेलं पण बेस्ट बंद होणार नाही. मुंबईकरांची अविरतपणे तशी सेवा करत राहील.' हेही वाचा.. आणखी एका मोठ्या धक्क्यासाठी तयार राहा, WHO ने जगाला दिला इशारा कोरोनाबाधित होण्याची भीती असतानाही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी काम करतात. अग्निशमन दलाचे असू दे किंवा मग बेस्ट असू दे किंवा पालिका प्रशासनाचे. आपल्या अनेक सहकाऱ्यांना गमावत आहेत आपल्या अनेक सहकाऱ्यांना करोना होताना बघत आहेत. पण तरीही अविरतपणे न घाबरता सेवा सुरू ठेवणाऱ्या सेवा या सगळ्या करोना योद्ध्याला एक कडक सॅल्यूट.
First published: