BREAKING: दहावीचा भूगोलचा पेपर रद्द, नववी आणि अकरावीची परीक्षा होणार नाही

BREAKING: दहावीचा भूगोलचा पेपर रद्द, नववी आणि अकरावीची परीक्षा होणार नाही

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. वाढता प्रादुर्भाव पाहता 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 12 एप्रिल: राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला आहे. त्यात आता शिक्षण विभागाने दहावीचा भूगोल पेपर आणि नववी, अकरावीच्या परीक्षाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

दहावीचा भूगोल पेपर रद्द करण्यात आला आहे. मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार आहेत. याबाबत महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आपली भूमिका लवकरच स्पष्ट करेल. त्याचबरोबर इयत्ता 9 आणि 11 वी परीक्षाही होणार नाही. आधीचे सरासरी मार्क लक्षात घेत विद्यार्थ्यांना मार्क्स दिले जातील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा..कोरोनाग्रस्तांसाठी आशेचा किरण, संजीवनी ठरतील 'ही' औषधं

दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी खबरादारी सरकारने शाळा, महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर केली आहे. दहावीच्या एका विषयाचा अखेरचा पेपर पुढे ढकलण्यात आला होता. याआधी दहावीची परीक्षा वेळेवर होणार असे सांगण्यात आले होते. 23 मार्च रोजी भूगोल विषयाचा पेपर होता. तो पेपर 31 मार्चनंतर होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याआधी दिली होती. 31 मार्चनंतर या पेपरच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. याआधी पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता.

हेही वाचा...‘COVID19विरुद्ध भारत मारणार का बाजी? सुरू आहे 40 पेक्षां जास्त लसींवर संशोधन

राज्यात कोरोनाचं संक्रमन झालं तेव्हा महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी दहावीची परीक्षा सुरू होती. 23 मार्चला भूगोल आणि सामाजिक शास्त्र-2 चा पेपर होता. दहावी बोर्डाचा हा शेवटचा पेपर राहिला होता. आता हा पेपर रद्द करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 12, 2020, 6:42 PM IST

ताज्या बातम्या