Home /News /mumbai /

धारावी, कोळीवाडा नाही... मुंबईत आता कोरोनाचा नवा हॉटस्पॉट; अंधेरीत 8 हजाराहून अधिक रूग्ण

धारावी, कोळीवाडा नाही... मुंबईत आता कोरोनाचा नवा हॉटस्पॉट; अंधेरीत 8 हजाराहून अधिक रूग्ण

Health workers prepare to screen residents of a building under lockdown during the Movement Control Order in Kuala Lumpur, Malaysia, Thursday, April 9, 2020. The Malaysian government issued a restricted movement order to help curb the spread of the new coronavirus. (AP Photo/Vincent Thian)

Health workers prepare to screen residents of a building under lockdown during the Movement Control Order in Kuala Lumpur, Malaysia, Thursday, April 9, 2020. The Malaysian government issued a restricted movement order to help curb the spread of the new coronavirus. (AP Photo/Vincent Thian)

मुंबईतील इतर भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असून आता नवे हॉटस्पॉट समोर येऊ लागले आहेत.

मुंबई, 24 जून : मुंबईत सुरुवातीच्या काळात होरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी आणि वरळी परिसरातील रुग्णसंख्या कमी करण्यात प्रशासनाला मोठं यश आलं आहे. मात्र अशातच मुंबईतील इतर भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असून आता नवे हॉटस्पॉट समोर येऊ लागले आहेत. अंधेरी पश्चिम प्रभागातही 4000 पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत, तर एकट्या अंधेरी पूर्व आणि पश्चिम मिळून 8894 इतकी रुग्णसंख्या झाली आहे. सध्या मुंबईत सर्वाधिक रुग्ण अंधेरी या उपनगरात आहेत. तर रुग्णांच्या संख्येत सगळ्यात आधी अंधेरी पूर्व, जी उत्तर आणि मग अंधेरी पश्चिम असा क्रमांक लागतो. दरम्यान, मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी होत असलेल्या चौफेर प्रयत्नांना यश येत असताना त्यामध्ये कोणतीही कसर न ठेवता आणखी आक्रमकरित्या उपाययोजना करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेने नुकतंच “मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग” हाती घेतले आहे. यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अवघ्या अर्ध्या तासात कोरोना चाचणीचा अहवाल देणाऱया अँटीजेन टेस्टिंगच्या एक लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. तसेच शासनाने नुकत्याच दिलेल्या मान्यतेनुसार रॅपिड टेस्टींग कीट खरेदी करुन आपल्या कर्मचाऱयांची चाचणी करण्यास कॉर्पोरेट हाऊसेस, खासगी कंपन्या यांनाही सुचवण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या उपस्थितीत विविध अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, संबंधित सहआयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच विविध वैद्यकीय प्रयोगशाळांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची 23 जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्त चहल यांनी विविध निर्देश दिले आहेत. राज्य शासनाने 22 जून रोजी शासन निर्णय प्रसारित केला आहे. त्यानुसार भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांनी मान्यता दिलेल्या एसडी बायोसेन्सर या एकमेव कंपनीच्या कीटद्वारे ॲन्टीजेन टेस्टींग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सध्याच्या आरटीपीसीआर या एकमेव निदान चाचणीच्या तुलनेत ही चाचणी अतिशय वेगवान बाधा निश्चित करणारी आहे. त्याचा उपयोग करुन कोरोना हॉटस्पॉट किंवा प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये तसेच अति जोखमीच्या आणि कोरोनासह इतर आजार असलेल्या रुग्णांची चाचणी करुन तातडीने बाधा निश्चिती करण्यात येते. या चाचणीचा परिणाम हा 15 ते 30 मिनिटांच्या आत प्राप्त होत असल्याने बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होते. ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने शासन मान्य ॲन्टीजेन कीटच्या 1 लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या कीट उपलब्ध होणार आहेत. हे कीट मुंबईतील महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, शासन रुग्णालये तसेच कोरोना उपचार केंद्र आदी ठिकाणी उपयोगात येतील. यातून लक्षणे दिसत असलेल्या संशयितांची तातडीने चाचणी करुन संसर्गाला रोखण्याची उपाययोजना अतिशय वेगवान होईल. संपादन - अक्षय शितोळे

तुमच्या शहरातून (मुंबई)

First published:

Tags: Coronavirus, Mumbai news

पुढील बातम्या