बापरे! राज्याचा धोका वाढला, 24 तासांत 5537 रुग्णांची वाढ; एकूण संख्या गेली 1 लाख 80 हजारांवर

बापरे! राज्याचा धोका वाढला, 24 तासांत 5537 रुग्णांची वाढ; एकूण संख्या गेली 1 लाख 80 हजारांवर

गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या सातत्याने वाढत असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

मुंबई 1 जुलै: राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. (Maharashtra covid 19 patient) गेल्या  24 तासांमध्ये तब्बल 5537 नव्या रुग्णांची वाढ झाली असून ही विक्रमी संख्या आहे.  त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 1,80,289 वर गेली आहे. राज्यात आज 189 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत 8053 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 2243 जण बरे होऊन घरी गेलेत. राज्याचा मृत्यू दर 4.47 एवढा झाला आहे. 79,095 एवढे Active रुग्ण आहेत.

मुंबईत एकूण रुग्ण  79145 रुग्ण आहेत.  त्यातले 29715 रुग्ण हे Active आहेत. शहरात आज 69 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 1487वर गेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या सातत्याने वाढत असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांचा विचार करता मुंबईत कलम 144 कलम लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत केवळ धार्मिक स्थळांना काही अटींसह सूट देण्यात आली आहे. कलम 144 चे आदेश जारी करण्याबरोबरच पोलीस आयुक्त प्रणय अशोक म्हणाले की, या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांचा विचार करता मुंबईत कलम 144 लागू केले जात असल्याचे पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी आदेशात म्हटले आहे. अशा परिस्थितीत एकाच ठिकाणी लोकांच्या गर्दीवर बंदी असेल. ते म्हणाले की, विशिष्ट नियमांचे पालन करून धार्मिक स्थळांना सूट देण्यात आली आहे.

अमेरिकेचा शहाणपणा; कोरोनावरच्या औषधाचा स्टॉक केला खरेदी; इतर देशांना नाही मिळणार

दरम्यान,  राज्यातील कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका (ambulance) उपलब्ध होत नसल्याचा तक्रारी येत होत्या. केवळ रुग्णालयात नेण्यासाठी वाहन उपलब्ध नसल्याने कित्येक तास रुग्णांना ताटकळत राहावं लागत होतं. आता यावर उपाय म्हणून उद्धव ठाकरे (CM Uddhav thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने (Maharashtra government) सगळ्या खासगी रुग्णवाहिका (Private ambulance) ताब्यात घ्यायचा निर्णय घेतला आहे. आता रुग्णवाहिकांचा दर सरकार ठरवणार आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आदेश (GR) काढण्यात आला आहे.

रुग्णालयात नेण्या-आणण्याची खासगी वाहनं जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आज आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर केला आहे. अधिग्रहित केलेल्या अँब्युलन्स जास्त गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येतील, असंही आदेशात म्हटलं आहे.

भारतातील सर्वात वयस्कर कोरोना फायटर; 103 वर्षांच्या आजोबांनी व्हायरसला हरवलं

राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी त्यांची संख्या वाढविण्याकरीता जिल्ह्यांमध्ये रुग्णालये, स्वयंसेवी संस्था यांच्याकडील रुग्णवाहिका उपलब्ध करून घेतानाच गरज भासल्यास खासगी वाहन पुरवठादारांची वाहने देखील रुग्णवाहक वाहन म्हणून वापर करण्याचा निर्णय झाला आहे.

संपादन - अजय कौटिकवार

First published: July 1, 2020, 8:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading