मुंबई, 20 मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेणार आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज संध्याकाळी 7 वाजता राजभवनात बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थितीत राहणार आहे. या बैठकीत राज्यातील कोरोना व्हायरसच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.
या बैठकीला मुख्य सचिव, विविध खात्यांचे सचिव, मनपा आयुक्त आणि राज्याचे पोलीस महासंचालक हे उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होते हे पाहण्याचं ठरणार आहे.
फडणवीसांची राज्यपालांकडे मागणी
विशेष म्हणजे, दुसरीकडे भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 19 मे रोजी राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलत असताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.
हेही वाचा -टीका करण्यापेक्षा मोदींकडे मदतीसाठी बोला,राष्ट्रवादी नेत्याचा फडणवीसांना टोला
'देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. कोरोनाचा सामना राज्य सरकारकडून योग्यरित्या होत नाही, अनेकांना उपचार मिळत नाहीत', असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला.
तसंच, 'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीसाठी पत्र लिहितात, त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लिहावं. राज्य सरकारकडून उपाययोजना नाही, केवळ राजकारण सुरू आहे', अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.
त्याचबरोबर, 'सामान्य माणसाला मदत झाली पाहिजे, राज्य सरकारने पॅकेज दिलं पाहिजे, बारा बलुतेदारांचा विचार सरकारने करायलाच हवा, अन्य राज्याने केला मग आमचं सरकार कधी करणार? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला होती.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.