Home /News /mumbai /

मुंबईत रेल्वे पोलिसाला कोरोना विषाणुची लागण, 25 पोलिस कर्मचाऱ्यांना केलं क्वारंटाइन

मुंबईत रेल्वे पोलिसाला कोरोना विषाणुची लागण, 25 पोलिस कर्मचाऱ्यांना केलं क्वारंटाइन

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स (सीएसएमटी) रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका कॉन्स्टेबलला कोरोना विषाणुची लागण झाली आहे.

कल्याण, 31 मार्च: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स (सीएसएमटी) रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका कॉन्स्टेबलला कोरोना विषाणुची लागण झाली आहे. पोलिस कॉस्टेबलचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबाधित कॉन्स्टेबल कल्याण (पश्चिम) येथील रहिवासी आहे. 25 पोलिस कर्मचाऱ्यांनी केले क्वारंटाइन.. दरम्यान, 15 मार्च पासून ते 27 मार्चपर्यंत या पोलिस कॉन्स्टेबलच्या संपर्कात आलेल्या 25 पोलिसांची देखील तपासणी करण्यात आली आहे. 25 पोलिस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हेही वाचा..VIDEO कोरोनामुळे घरात बंद असताना प्रेयसीला भेटण्यासाठी तरूणाची भन्नाट शक्कल 30 मार्च रोजी पोलिस कॉन्स्टेबलला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याचा खोकलाही वाढला होता. त्यामुळे त्याला कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात त्यांना दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. येथे उपचार घेतल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्यासोबत 15 मार्च ते 22 मार्च सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि 24 मार्च ते 27 मार्च लॉकअप गार्ड येथे संपर्कात आलेल्या 25 पोलिस कर्मचाऱ्यांची देखील तपासणी करण्यात आली असून त्यांनी क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हेही वाचा..Mission Corona : बाळाचं नाव ठेवलं 'लॉकडाऊन', म्हणे मोदींचा संकल्प पुढे नेणार डोंबिवलीत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पूर्णतः बंद! दुसरीकडे, कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली (पूर्व) येथील राजाजी पथ, विजयनगर, बालाजी गार्डन, कोपर स्टेशन झोपडपट्टी व आहिरे गाव, सहकारनगर हे भाग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. तेथील रहिवाशांनी घरातून बाहेर पडू नये. महानगरपालिकेचे भरारी पथक सुद्धा त्या परिसरात तैनात केले आहे. त्यामुळे शक्यतो नागरिकांनी सहकार्य करावे व घराबाहेर जाण्याचे टाळावे. नागरिकांना लागणारे किराणा समान, भाजीपाला व औषधे घरी पोहोचवली जातील. त्यामुळे प्रभागातील दिलेल्या दुकानदारांच्या दूरध्वनी क्रमांकाला संपर्क साधून आपल्या सोयी पूर्ण कराव्यात. महानगरपालिकेला आपल्या सहकार्यची अपेक्षा आहे, असं आवाहन करण्यात आलं आहे.  एका दिवसात 72 नवे रुग्ण दरम्यान, महाराष्ट्रात एका दिवसात 72 कोरोनाव्हायरसचे नवे रुग्ण दाखल झाले आहेत. ही एका दिवसातली आतापर्यंतची सर्वांत मोठी संख्या आहे. देशभरात कुठल्याही एका राज्यात एकदम एवढ्या संख्येने रुग्णांमध्ये वाढ झालेली नाही. आता राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 302 झाला आहे.  आजचा दिवस राज्यासाठी धक्कादायक ठरला. संपूर्ण राज्य लॉकडाउन असतानाही एकदम 72 ने रुग्णसंख्या वाढली. 230 वरून आकडा थेट 302 झाला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Kalyan

पुढील बातम्या