Home /News /mumbai /

'कोरोना'ची राज्याला हादरावून सोडणारी बातमी, वडिलांमुळे 3 वर्षांच्या मुलीला लागण

'कोरोना'ची राज्याला हादरावून सोडणारी बातमी, वडिलांमुळे 3 वर्षांच्या मुलीला लागण

(संग्रहित फोटो)

(संग्रहित फोटो)

    मुंबई, 16 मार्च : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे.  कोरोना रुग्णांचा आकडा हा 39 वर पोहोचला आहे. अशातच अवघ्या 3 वर्षांच्या मुलीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बाब मुंबईत समोर आली आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये या कुटुंबाला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तिघांचीही प्रकृती स्थिर आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.या मुलीच्या वडिलांना कोरोनाची बाधा झाली होती. वडिलांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर  या 3 वर्षांची मुलीलाआणि तिच्या 33 वर्षांच्या आईलाही कोरोनाची बाधा झाली. आज दोघांचे रिपोर्ट आले असता यात दोघींनाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं, असल्याची माहिती कस्तुरबा रुग्णालयामधील डॉक्टरांनी जाहीर केलं. त्यामुळे राज्यात सर्वात कमी वयाच्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. समाधानाची बाब म्हणजे, या चिमुरडीची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहे. बारामतीतील दोन भाऊ कोरोना संशयित दरम्यान, बारामतीमध्ये एकाच कुटुंबातील दोन जणांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  या दोन्ही संशयित भावांना पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बारामती शहराच्या हद्दीत राहणाऱ्या या कुटुंबातील लहान भाऊ हा पिंपरी चिंचवडमध्ये नोकरी करत आहे. अचानक काही दिवसांपूर्वी त्याला सर्दी, खोकला आणि घश्यात दुखू लागले होते. याची माहिती मिळताच मोठा भाऊ पिंपरीमध्ये जाऊन लहान भावाला घरी सोबत घेऊन आला. परंतु, काही दिवसांनी मोठ्या भावालाही सर्दी, खोकला, ताप आणि घसा दुखायला लागला. त्यामुळे दोन्ही भावांना  आज  शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यानंतर या दोघांना दुपारी 12 वाजेच्या सुमारास पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. दोन्ही भावांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे का? याची तपासणी सुरू आहे. दोन्ही भावांना सध्या संशयित रुग्ण म्हणून उपचार सुरू आहे. आतापर्यंत मुंबईत 5 रुग्ण पॉझिटिव्ह दरम्यान, राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 39 वर गेली आहे. मुंबईतला कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखीन 5 रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती आहे. मुंबई आणि नवी मुंबईत नवीन ही नवीन रुग्णांची भर पडली आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्ग लक्षात घेता शाळा, महाविद्यालयं, चित्रपट गृह बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यापाठोबात आता मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असल्यानं मुंबईकरांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. (संग्रहित फोटो)
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: China

    पुढील बातम्या