Coronavirus पाहत नाही वय, सर्वांनाच बनवतोय आपला शिकार; हा घ्या पुरावा

Coronavirus पाहत नाही वय, सर्वांनाच बनवतोय आपला शिकार; हा घ्या पुरावा

Coronavirus सर्वात जास्त धोका वयस्कर व्यक्तींना आहे, असं अनेक अभ्यासातून दिसून आला आहे. मात्र भारतातील (India)ही आकडेवारी पाहिल्यानंतर धक्काच बसेल.

  • Share this:

मुंबई, 29 मार्च : कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) सर्वात जास्त धोका वयस्कर व्यक्तींना आहे, असं अनेक अभ्यासातून दिसून आला आहे. मात्र भारतातील ही आकडेवारी पाहिल्यानंतर धक्काच बसेल.  भारतात कोरोनाव्हायरसमुळे ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 40 ते 90 वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. डाटा स्टोरी टेलर नॉर्बर्ट यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये नमूद केल्यानुसार,

महाराष्ट्र - 85 वर्षीय डॉक्टर

तेलंगना - 74 वर्षीय व्यक्ती

केरळ - 69 वर्षीय व्यक्ती

जम्मू-काश्मीर - 62 वर्षीय व्यक्ती

दिल्ली -60 वर्षीय येमेनमधील नागरिक

गुजरात - 46 वर्षीय महिला

गुजरात - 45 वर्षीय व्यक्ती

या सर्वांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय बिहारमध्ये 38 वर्षांच्या तरुणाचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक तरुणांना (young people) कोरोनाव्हायरसने विळखा घातला आहे.

28 मार्चला राज्य सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 154 रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण तरुण आणि प्रौढ आहेत. तर वयस्कर व्यक्तींचं प्रमाण कमी आहे.

या आकडेवारीनुसार,

-60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले फक्त 20 रुग्ण आहेत

-तर 21 ते 60 वयोगटातील तब्बल 115 रुग्ण आहेत.

-31 ते 40 वयोगटात सर्वाधिक 38 रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनामुळे आणखी एका महिलेचा मृत्यू, राज्यातील मृतांचा आकडा 07

त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे. फक्त वयस्कर व्यक्तींनी नव्हे तर सर्वच वयोगटातील व्यक्तींनी काळजी घेण्याची गरज आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजारवर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 24 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या रविवारी 193 वर पोहोचली आहे.

कोरोनाग्रस्तांसाठी अभिनेत्री झाली नर्स, अभिनय सोडून करतेय रुग्णांची सेवा

First published: March 29, 2020, 2:33 PM IST

ताज्या बातम्या